पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

> ओटीपोटात वेदना होतात, स्त्रीचा जीव धोक्यात येतो. अशा वेळी तातडीने शस्त्रक्रिया करून ही वाढ काढून टाकावी लागते. गर्भधारणा झाल्यावर गर्भधारणा झाली की मासिक पाळी बंद होते. गर्भाशयमुखाचं तोंड एका पांढऱ्या घट्ट नावानी (सायकल म्युकस) बंद होतं. गर्भाशयाच्या आत एक कवच तयार होते. या कवचात 'ऍम्निऑटिक' नाव तयार होतो. या नावात गर्भ वाढायला लागतो. गर्भाशयात एक वार तयार होते व वार व गर्भाला जोडणारी एक नाळ बनते. गर्भाच्या वाढीसाठी मातेकडून गर्भाला विविध घटक पुरवले जातात. हे घटक वारेतून नाळेत व नाळेतून गर्भापर्यंत पोहोचतात. गर्भात निर्माण झालेले नको असलेले स्राव नाळेतून वारेत व वारेतून मातेपर्यंत पोहोचतात. मातेकडून सगळेच घटक गर्भापर्यंत पोहोचत नाहीत. वारेत एक गाळण्यासारखी व्यवस्था असते. त्यातून काही मोजकेच घटक वारेतून नाळेत जातात.(या गाळण्यासारख्या व्यवस्थेमुळेच आईचा व बाळाचा रक्तगट वेगळा असू शकतो.) ही रचना, आईत असलेल्या काही किटाणू, विषाणूंपासून गर्भाला सुरक्षित ठेवते. पण ही रचना शंभर टक्के गर्भाला संरक्षण देत नाही. उदा. गर्भार मातेला गर्मी (सीफिलीस) एसटीआय असेल, तर गर्भालाही गर्मी होण्याची शक्यता असते. म्हणजे ही गाळण्याची रचना गर्भाला गर्मीच्या जिवाणूंपासून संरक्षण देत नाही. वार नाळ गर्भाशय गर्भ - गर्भाशयमुख योनी मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १९१