पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घेतल्याने अनपेक्षित व घातक परिणाम दिसू शकतात. तंबाखू / सिगारेट तंबाखूमध्ये अनेक रसायनं आहेत. यातील महत्त्वाचं रसायन म्हणजे निकोटिन. निकोटिन पूर्वी कीटकनाशक म्हणून वापरलं जायचं. तंबाखू तोंडात चावून चघळण्याने रक्तदाब वाढतो, मेंदूला जास्त रक्तपुरवठा होतो, इंद्रियं जास्त तल्लख काम करतात व विविध इंद्रियांचे संदेश जास्त परिपूर्णतेनं अनुभवले जातात. सारखी तंबाखू घेतल्याने तोंडाचा कर्करोग व हिरड्यांचे विकार होण्याची शक्यता खूप वाढते. सिगारेटमध्ये तंबाखू असते. सिगारेटच्या धुरातून अनेक रसायनं शरीरात जातात. उदा. निकोटिन, 'टार',co. टार सिगारेट ओढणाऱ्या लोकांच्या दातांना पिवळं बनवतो, हाताच्या बोटांना लागल्यावर बोटं पिवळी दिसायला लागतात. सिगारेटच्या धुरातून टार फुफ्फुसात जाते ज्याच्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. बीडीला फिल्टर नसल्यामुळे बीडीही टारचा जास्त स्ट्राँग डोस देते. श्वसननलिकेतल्या केसांच्या कार्यावर टारचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे छातीचे विकार होण्याचा धोका वाढतो. CO वायू रक्तातील हिमोग्लोबिनचं कार्बोक्सी हिमोग्लोबिनमध्ये रूपांतर करतो. त्यामुळे विविध पेशींना ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो. खूप प्रमाणात सिगारेट पिणाऱ्या पुरुषांच्या पुरुषबीज निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. रक्तवाहिन्या अरुंद होऊन (अथेरोस्क्लेरॉसिस) लिंगाला उत्तेजना येण्यास अडचण येते. बायकांमध्ये रजोनिवृत्ती लवकर येणं, गर्भार महिलांचा गर्भ पडणं, कमी वजनाची मुलं जन्माला येणं, 'प्रीमॅच्युअर' प्रसूती होणं असे परिणाम दिसतात. - - नशाव कायदा वर दिलेले बहुतेक सर्व पदार्थ बनवणं, विकणं, सेवन करणं कायदयानं गुन्हा आहे-'द नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अॅक्ट', १९८५. (याला अपवाद ठराविक नियमानुसार, पद्धतीनुसार वैदयकीय किंवा संशोधनाच्या कारणांसाठी या पदार्थांचा वापर करता येतो.) भारतीय घटेनच्या कलम ४८ नुसार भारतातील राज्यं दारूची निर्मिती, वितरण, विक्री, सेवन यांवर नियंत्रण लादू शकतात, बंदीही आणू शकतात. तंबाखूव सिगारेट सेवनावर नियंत्रण असावं म्हणून अठरा वर्षांखालील व्यक्तींना तंबाखू/सिगारेट विकण्यास बंदी आहे. तंबाखू/सिगारेटची टिव्हीवर जाहिरात करण्यास बंदी आहे. ('द सिगारेट अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स अॅक्ट,' २००३). १८६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख