पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हॅल्यूसीनोजेन्स वर्ग हे पदार्थ घेण्याने त्या व्यक्तीला विचित्र भास होतात. उदा. 'एल.एस.डी.', 'सायलोसायबीन' इ. एल.एस.डी. रसायन अगदी सूक्ष्म प्रमाणात घेऊन व्यक्तीला अनेक तास विचित्र भास होतात-काहींना खूप सुखद तर काहींना खूप भयानक. या पदार्थांनी होणाऱ्या लैंगिक दुष्परिणामांची माहिती माझ्या वाचनात आली नाही. हे रसायन घेणं बंद केलं तरीसुद्धा अनेक वर्षांनंतर अचानकपणे असे विचित्र भास त्या व्यक्तीला कोणतंही कारण नसताना होऊ शकतात(एल.एस.डी.सायकोसिस). कॅनॅबिस वर्ग या वर्गात कॅनॅबिस' झाडापासून मिळालेले अंमली पदार्थ येतात. उदा. गांजा, भांग यांच्यातील 'टी.एच.सी.' रसायन नशा देतं. भांग पाण्यातून किंवा दुधातून घेतली जाते. ही घेऊन खूप हसायला येणं, गोड खावंसं वाटणं, घशाला कोरडेपणा येणं, एकाग्रता कमी होणं, वेळेचा अंदाज न येणं असे परिणाम दिसतात. सातत्यानं हे पदार्थ घेतल्यामुळे पुरुषबीज निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. ओपॉईड अॅनालजेसिक्स वर्ग या वर्गाचे पदार्थ वेदना शमवण्याचं काम करतात. उदा. अफू व त्याच्यापासून बनवलेले पदार्थ, उदा. 'मॉरफिन', 'हेरॉईन'. हेरॉईनचा जास्त झटका मिळावा म्हणून ती इंजेक्शनद्वारे घेतली जाते, जिच्यामुळे ती थेट रक्तात उतरते. ती रक्तात भिनताना कमालीचं सुख अनुभवायला मिळतं. हेरॉईनमुळे भूक कमी होणं, मलावरोध होणं, काही करू नये असं वाटणं असे परिणाम दिसतात. या पदार्थामुळे लैंगिक इच्छा खूप कमी होते, वीर्यपतन होण्यास अडचण येऊ शकते. या वर्गातील पदार्थ अत्यंत व्यसन जडवणारे आहेत. सावधान

  • शरीराचा टॉलरन्स' वाढला की तोच परिणाम साधायला त्या नशेचं सेवन

वाढवावं लागतं. पण घेतला जाणारा पदार्थ पूर्वीपेक्षा जास्त शुद्ध असेल तर आपल्या शरीराला नशेचं किती प्रमाण चालेल याचा अंदाज चुकू शकतो. उदा. हेरॉईनचा शरीराला झेपेल याच्यापेक्षा जास्त डोस दिला तर व्यक्तीचा ओव्हरडोसमुळे मृत्यू होतो.

  • काहीजण विविध नशिले पदार्थ एकत्र करून घेतात, कोणता पदार्थ दुसऱ्या

कोणत्या पदार्थावर घ्यायचा व कोणता पदार्थ कोणत्या पदार्थाबरोबर घ्यायचा नाही याची माहिती नशा करणाऱ्यांना नसेल तर घातक परिणाम होऊ शकतात. कारण यांतील अनेक पदार्थ एक दुसऱ्याबरोबर घ्यायचे नसतात. उदा. दारू व हेरॉईन एकत्र मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १८५