पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नशा 7) हल्ली पार्टीजमध्ये अंमली पदार्थ सहज उपलब्ध होतात. अंमली पदार्थ हाती लागले नाहीत तरी नशा देणारे अनेक पदार्थ आहेत जे अगदी सहज उपलब्ध होतात. अशा पदार्थांचं व्यसन जडू शकतं. एक पदार्थ 'ट्राय' केला की हळूहळू इतर पदार्थ घ्यायची इच्छा होते. एका व्यसनमुक्ती केंद्रातील तरुण म्हणाला, "आमच्या (इस्लाम) धर्मात दारू पिण्यास मनाई आहे म्हणून मी दारू फार क्वचित घेतो पण शाळेत आल्यापासून मी नशा करतो. १५ ते १८ या वयात मी 'कोकेन', 'एल.एस.डी', 'एकस्टसी', चरस हे सगळं घेतलं. घरचं दुकान होतं. तिथून पैसा चोरायचो. कधी नशा करून तर कधी नशा न करता गर्लफ्रेंडबरोबर सेक्स करायचो. मला असं वाटतं की 'कोकेन व चरस ध्यायचो, तेव्हा माझा संभोगाचा कालावधी वाढायचा. प्रत्येक अंमली पदार्थाचा किती व कसा परिणाम होतो हे त्या पदार्थावर अवलंबून असतं. प्रत्येक पदार्थाचं व्यसन जडवायची ताकद वेगळी असते. उदा. हेरॉईनची व्यसन जडवायची ताकद भांग/गांजापेक्षा खूप जास्त आहे. त्याचबरोबर तो पदार्थ किती शुद्ध आहे, तो पदार्थ कोणत्या मार्गाने घेतला आहे (जो पदार्थ इंजेक्शनद्वारे घेतला जातो तो लगेच परिणाम साधतो), किती प्रमाणात घेतला आहे, किती पदार्थ एका वेळी घेतले आहेत, शरीराला त्या पदार्थाची किती सवय आहे इत्यादी गोष्टीवर त्याचा परिणाम अवलंबून असतो. अशा पदार्थांचे काही प्रमुख वर्ग व त्या वर्गातील नमुन्यादाखल एका पदार्थाची व त्याने होणाऱ्या परिणामांची माहिती खाली दिली आहे. 7 मेंदूची चालना कमी करणारे पदार्थ (सी.एन.एस.डिप्रेसन्ट्स) हे पदार्थ घेतले की मेंदूची चालना मंदावते. उदा.दारू, बार्बीच्युरेट्स. दारूबद्दल या अगोदर माहिती दिली आहे. मेंदूची चालना वाढवणारे पदार्थ (सी.एन.एस.स्टिम्यूलन्ट्स) हे पदार्थ मेंदूची चालना वाढवतात. उदा. कोकेन', 'अॅम्फेटामाइन्स'. कोकेन ची पावडर नाकातून हुंगून किंवा हिरड्यांना चोळून घेतली जाते. नाकातून घेतली तर नाकातून थोडं रक्त येऊ शकतं. सातत्याने कोकेन नाकाने घेतल्यामुळे नाकामधलं 'सेप्टम' झिजायला लागतं. हा पदार्थ घेतल्याने रक्तदाब वाढतो, झोप कमी होते, भूक कमी होते, उत्साह वाढतो, इंद्रियं जास्त केंद्रित होऊन काम करतात. कोकेन घेऊन संभोग करताना लैंगिक सुख जास्त मिळतं असा काहींचा अनुभव आहे. दीर्घकाळ कोकेन घेतल्यामुळे लिंगाला उत्तेजना येण्यास अडचण येऊ लागते. १८४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख