पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोणाशी बोलते, कुठे जाते यावर पाळत ठेवली जाते." जोडीदार संभोगास राजी असेल तर लिंगाला ताठरपणा येण्यास अडचण येऊ शकते. संभोग करताना मेंदू व्यवस्थितपणे लैंगिक सुख अनुभवू शकत नाही. त्यामुळे लिंगाला ताठरपणा न येणं, अर्धवट ताठरपणा येणं, मधूनच लिंगाचा ताठरपणा जाणं हे परिणाम दिसतात. एकीकडे आपण पुरुषार्थ सिद्ध करायला बघतो आहोत आणि एकीकडे मात्र आपली फजिती झाली याची शरम वाटते. जर लिंगाचा ताठरपणा राहिला तर लगेच वीर्यपतन होणं किंवा दीर्घकालापर्यंत वीर्यपतन न होणं असे परिणाम दिसतात. यामुळे लैंगिक समाधान मिळत नाही. हे असमाधान कमी करण्यासाठी अजून दारू प्यायली जाते. अशा दुष्टचक्रात ती व्यक्ती सापडते. या गोष्टी (आपलं शरीर साथ देत नाही) वारंवार घडायला लागल्या की तो पुरुष शरमेनं जोडीदाराला टाळायला लागतो. बाहेर मात्र आपण कसे 'स्टड' आहोत या बढाया मारणं चालू असतं - 'बायको जवळ करत नाही ना तर नको करू देत. इतर स्त्रिया आहेत ना' असा विचार करून इतर स्त्रियांच्या मागे लागणं सुरू होतं. इथेही शरीराची साथ मिळाली नाही की नैराश्य वाढतं. आपल्याला लैंगिक सुख मिळत नाही म्हणून चोवीस तास लैंगिक सुखासाठी मन वखवखलेलं असतं. दारू व कुपोषणामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. नशेत जोडीदाराबरोबर संभोग करतेवेळी निरोधचा वापर करायचं भान राहत नाही. अशा परिस्थितीत जर जोडीदार एसटीआय/एचआयव्हीसंसर्गित असेल तर ती लागण होण्याची शक्यता असते. स्त्रीला दारू पाजून तिला नशा चढली की त्या स्थितीत तिचा गैरफायदा घेऊन तिच्याबरोबर संभोग करण्याच्या घटना वारंवार होतात. जसं काही वेळा नशेमुळे लैंगिक समस्या निर्माण होतात तसंच काही वेळा आपण आपल्या लैंगिक इच्छा/गरजा स्वीकारल्या नसतील तर दारूची सवय लागू शकते. दारू प्यायल्यामुळे प्रश्न सुटत तर नाहीच पण त्याने अनेक वेळा नवीन लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात. एकजण म्हणाले, “मला शरीराची गरज पुरी करण्यासाठी वेश्यांकडे जायची इच्छा होते. पण मी ज्या संस्कृतीत वाढलो त्यात मला वेश्यांकडे जायला अपराधी वाटतं. हा अपराधीपणा घालवण्यासाठी मी पितो. त्यानी मनावरचं दडपण कमी होतं व बुधवार पेठेत (पुण्याचा लाल बत्ती इलाका) जायचा धीर येतो. आता याची इतकी सवय लागली आहे की प्यायल्याशिवाय संभोग करायचा धीरच होत नाही." दुसरं एक उदाहरण एक समलिंगी पुरुष म्हणाला, "मी एका पुरुषाला मागणी घातली व ती त्यानं नाकारली. मला माहीत आहे की तो भिन्नलिंगी आहे. त्याला माझ्यात 'इंट्रेस्ट' नाही पण तरीही माझ्या मागणीचा अस्वीकार मला माझा अस्वीकार वाटला. त्यानं मला नैराश्य आलं व मी दारू प्यायला लागलो. - " मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १८३