पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दारूची विल्हेवाट लावण्याची मुख्य जबाबदारी यकृत करतं. ते दारूचं रूपांतर Co., पाणी व इतर द्रव्यांत करतं. दारूची थोड्या अंशी विल्हेवाट ही श्वसनातून व घामातून लावली जाते. सातत्यानं दारू प्यायची सवय लागली की यकृताला सूज यायला लागते. त्याच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. पुढे यकृताच्या पेशी मरायला लागतात. याला 'लिव्हर सिरॉसिस' म्हणतात. जर यकृताच्या बहुतांशी पेशी मेल्या तर हळूहळू अपायकारक रसायनं आपल्या रक्तात वाढायला लागतात. त्यामुळे शरीरातील एकेक अवयव बंद पडायला लागतो व मृत्यू ओढवतो. लैंगिक परिणाम सातत्यानं दारू पिऊन पुरुषांची वृषणं सुकायला लागतात. ('टेस्टिक्यूलर अॅट्रोफि'). खूप दारू पिणाऱ्या काही पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. काही पांच्या पुरुषबीज निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. यामुळे तारुण्यापासून जर खूप दारू प्यायची सवय असेल तर काहींना मुलं व्हायला अडचण येऊ शकते. काही पुरुषांमध्ये स्तनांची वाढ झालेली दिसते (गायनॅकोमॅस्टिया). पुरुषांच्या तुलनेत दारूचं व्यसन स्त्रियांमध्ये कमी आढळतं (पण हे प्रमाण वाढत आहे). सातत्याने दारू पिऊन स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होऊ शकते. स्त्रीबीज परिपक्व होण्यास अडचण येऊन कायमचं वंध्यत्व येऊ शकतं. गर्भार स्त्री जर दारू पित असेल तर दारू नाळेतून गर्भापर्यंत पोहोचते. याचा गर्भावर परिणाम होतो. गर्भ पडणं, कमी वजनाचं मूल जन्माला येणं, मुलाची बौद्धिक वाढ कमी असणं या गोष्टींची शक्यता वाढते. जन्म झाल्यावर मातेपासून वेगळं झाल्यामुळे नवजात बालकाला मातेपासून दारू पोहोचत नाही त्यामुळे बाळात 'विथड्रॉल' लक्षणं दिसू शकतात ('फीटल अल्कोहोल सिंड्रोम'). लैंगिक नाती लैंगिक इच्छा झाली की दारू/नशेत धुत असलेला पुरुष जोडीदाराच्या जवळ यायचा प्रयत्न करतो. त्या पुरुषाचा स्पर्श जोडीदाराला अंगावर काटा आणणारा असतो. त्याच्याबरोबर लैंगिक सुख उपभोगण्याचा विचारही करवत नाही. त्याला नकार मिळाला की त्याचा अहंकार दुखावतो. अशा वेळी चिडून काही वेळा तो जोडीदारावर जबरदस्ती करतो. जोडीदार सारखी दूर करू लागली की त्याचं परिवर्तन संशयात होतं. डॉ. कौस्तुभ जोग म्हणाले, "बायकोच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते कारण ज्याअर्थी बायको आपल्याला नाही म्हणते त्याअर्थी तिला बाहेरून कुठूनतरी लैंगिक सुख मिळत असलं पाहिजे असा सोईचा अर्थ लावला जातो. स्वभाव संशयी बनत जातो. ती १८२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख