पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- टक्क्यांच्या आसपास असतं (काही वेळा हातभट्टीच्या दारूत भेसळ मिसळली जाते. यात जर मेथिल अल्कोहोल' किंवा 'आयसोप्रोपील अल्कोहोल' ही विषारी रसायनं मिसळली असतील, तर त्यानी आंधळेपणा/मृत्यू येतो.). जेवढं 'एथील अल्कोहोल'चं प्रमाण जास्त तेवढा तिचा परिणाम जास्त. उपाशी पोटी घेतलेली दारू लवकर रक्तात पोहोचते. सोड्याबरोबर घेतलेली दारू पाण्याबरोबर घेतलेल्या दारूपेक्षा जास्त लवकर रक्तात पोहोचते. दारू पोटात उतरली की ती जठर व छोट्या आतड्यातून रक्तात मिसळते. रक्तात मिसळून ती शरीरभर पसरते. रक्तातून ती मेंदूपर्यंत पोहोचते. थोडी दारू घेतली की सुरुवातीला जरा मोकळं, रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. जास्त दारू घेतली, की तिच्यामुळे शरीरातील स्नायूंच्या कार्यशीलतेवर (मोटर को-ऑरडिनेशन) वर विपरीत परिणाम होतो. म्हणजे गाडी चालवताना अंदाज चुकणं, बोलताना जीभ थोडी अडखळणं इत्यादी. खूप दारू घेतली की तोल जायला लागतो. पुढे बेशुद्ध अवस्था व त्याच्या पुढे कोमा व श्वसन बंद पडल्यामुळे (रेस्पिरेटरी डिप्रेशन) मृत्यू. लोकांना दारू प्यायची सवय का लागते? याचे चार तर्क मांडले गेले आहेत- (१) गुणसूत्र - काही संशोधकांचा तर्क आहे, की दारूची सवय जडायला काही विशिष्ट गुणसूत्रांची रचना असू शकते. ज्यांच्या गुणसूत्रात ही विशिष्ट रचना आहे त्यांना ही सवय जडायची जास्त शक्यता असते. (२) संप्रेरक - काही संशोधक असे मानतात, की दारू व नशा सातत्यानं घेऊन आपल्या संप्रेरक निर्मितीत फरक पडतो. त्याच्यामुळे ज्या पेशी नशेतील रसायनांचा वापर करतात त्या पेशींच्या 'रिसेप्टर्स' ची संख्या बदलते. दारू/नशा घेणं थांबवलं की या 'रिसेप्टर्सना' ही रसायनं मिळत नाहीत व म्हणून शरीराला ती परत परत हवीहवीशी वाटतात. याच्यामुळे व्यसन जडतं. (३) मानसिक अवलंबित्व -काहीजणांमध्ये आत्मविश्वास खूप कमी असतो. सारखं कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणायला पाहिजे (पॉझिटिव्ह स्ट्रोक्स) अशी इच्छा असते. दारू घेऊन आपल्या समस्या, काळज्या, अपयश कमी झालं आहे आहे असं वाटतं. म्हणून जर आत्मविश्वासाचा अभाव असेल, स्व-प्रतिमा खूप खालावलेली असेल तर अशा व्यक्ती दारूचा आधार घेतात व दारूची सवय लागते. (४) संस्कृती- काही आदिवासी जमातींमध्ये अनेक पुरुष/स्त्रिया दारू घेतात. शहरातल्या काही स्तरांमध्ये दारू पिणं हे 'स्टेटस'चं लक्षण मानलं जातं. दारू घेणं जर समाजमान्य असेल तर ती इतरांबरोबर वारंवार घेतली जाते व ती घ्यायची सवय लागते. यांतील एक किंवा अनेक कारणांमुळे दारू प्यायची सवय लागू शकते. १८० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख