पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दारू/नशा 7 "दारूचं व्यसन लागलं तर लिंगाला उत्तेजना येण्यास अडचण होते का हो?" किंवा "दारूमुळे खूप वेळ संभोग केला तरी वीर्यपतन होत नाही असं होऊ शकतं का?" अशा प्रकारचे अनेक प्रश्न मला व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्यशाळेत विचारले जातात. , हल्ली अनेक कॉलेजची मुलं दारू पितात. नशा घेण्याचंही प्रमाण वाढू लागलं आहे. गंमत म्हणून, उत्सुकता म्हणून, मित्रांचा दबाव म्हणून, दारू/नशा घ्यायला सुरुवात होते. काहींना दारू/नशा घेण्यावर नियंत्रण ठेवता येतं, तर.काहींना या पदार्थांची सवयच लागते व त्याच्या आहारी जाऊन आयुष्य दिशाहीन होतं. दारू दारू विविध प्रकारच्या फळांपासून किंवा धान्यांपासून बनवली जाते. दारूमध्ये 'एथील अल्कोहोल' रसायन असतं. प्रत्येक दारूच्या प्रकारात 'एथील अल्कोहोल'ची मात्रा वेगवेगळी असते. बिअरमध्ये 'एथील अल्कोहोल' चं प्रमाण ८ टक्के असतं, वाईनमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास असतं, व्हिस्कीमध्ये ४० दारूमध्ये 'एथील अल्कोहोल'चं प्रमाण ४५ ४० ४०% ३५ ३० २५ २० १५ १५% १० ०८% ०५ ०० बिअर वाईन व्हिस्की मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १७९