पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करतात. अशाने जोडीदाराला एआरटी रेझिस्टंट एचआयव्हीचा संसर्ग होतो. असं बेजाबदार वर्तन करू नये. क्वचित अशीही उदाहरणं आहेत जिथे, “मला हा विषाणू दुसऱ्यानी दिला म्हणून आता मीही तो इतरांना देणार" असा विचार करून मुद्दामहून असुरक्षित संभोग करून इतरांना एचआयव्हीसंसर्गित करण्याचा विचार होतो. आपल्याला असलेला गंभीर संसर्गित आजार दुसऱ्याला होईल असं मुद्दामहून वर्तन करणं गुन्हा आहे- भा.दं.सं.२७०. आपण लैंगिक सुखासाठी जोडीदार शोधायची अतोनात खटपट करतो पण सुरक्षित संभोगाची जबाबदारी मात्र आपण उचलायची तयारी दाखवत नाही. ती जबाबदारी मात्र आपण जोडीदारावर टाकून मोकळे होतो व त्याच्यापासून एसटीआय/एचआयव्ही/एड्सची लागणं झाली की सोयीनं जोडीदाराला जबाबदार धरतो. ही खरंच खेदाची गोष्ट आहे.

१७८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख