पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिंग-योनीमैथुन व गुदमैथुन करताना निरोध फाटला तर जोडीदाराला एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता आहे, म्हणून पर्यायी लैंगिक सुखाचे मार्ग वापरता येतात. लिंगावर ‘फ्लेवर्ड' निरोध चढवून मुखमैथुन करणं, योनीत पुरुषाने बोट घालून स्त्रीला सुख देणं, स्त्रीच्या मांडीत लिंग घालून संभोग करणं इत्यादी. या मार्गातून स्त्रीला एचआयव्हीची लागण होणार नाही व दोघांनाही काही अंशी लैंगिक सुख मिळेल. सावधान अशा वेळी पुरुषाने खूप उत्तेजित होऊन जोडीदाराची इच्छा नसताना जबरदस्तीनं योनीमैथुन किंवा गुदमैथुन करू नये. जर दोघंही जोडीदार एचआयव्हीसंसर्गित असतील तर संभोगाच्या वेळी निरोधचा वापर करावा किंवा वर दिले आहेत तसे इतर लैंगिक सुखाचे मार्ग अवलंबावेत. जर एकाला 'एआरटी' औषधं सुरू झाली असतील व दोघांनी असुरक्षित संभोग केला तर जोडीदारामध्ये येणारा एचआयव्ही विषाणू 'एआरटी रेझिस्टंट' असतो; म्हणजेच दुसऱ्याला जेव्हा 'एआरटी'ची आवश्यकता पडेल तेव्हा जोडीदार घेत असलेली 'एआरटीची' औषधं उपयोगी पडत नाहीत. एचआयव्ही संसर्ग व पालकत्व एचआयव्हीसंसर्गित जोडप्यांनी मूल जन्माला घालावं का? हा वादाचा मुद्दा मानला लागतो. काही अॅक्टिव्हिस्टस म्हणतात, की मूल जन्माला घालण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. यात कोणावरही भेदभाव केला जाऊ नये. आता तंत्रज्ञानामुळे व विशिष्ट काळजी घेऊन (नेव्हीरपीन औषधाचा वापर करून, सीझेरियन शस्त्रक्रियेने प्रसूती करून इत्यादी) एचआयव्हीसंसर्गित मातेपासून जन्माला येणाऱ्या बाळाला एचआयव्हीची लागण असण्याचं प्रमाण अंदाजे ५ टक्के इतकं कमी झालं आहे. तर काहीजणांचं मत आहे की आई व वडील एचआयव्हीसंसर्गित असतील तर या आजारामुळे ते मुलांना ढवण्यास सक्षम नसतात. जर ते लवकर वारले तर मुलांना वाढवण्याची नातेवाइकांची इच्छा नसते व मुलं अनाथ होतात. जर मूल एचआयव्हीसंसर्गित असेल तर त्याचे अतोनात मानसिक व शारीरिक हाल होतात. म्हणून त्या मुलांचा विचार करून अशा जोडप्यांनी आपली पालकत्वाची गरज पुरी करायचा हट्ट धरू नये, मुलं जन्माला घालू नयेत. जबाबदार लैंगिक वर्तन एचआयव्हीचा संसर्ग झाल्यावर त्या व्यक्तीनं कोणाबरोबरही असुरक्षित संभोग करू नये. काहीजण एआरटी सुरू झाल्यावर कालांतराने परत असुरक्षित लैंगिक वर्तन मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १७७