पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तत्त्वाच्या विरोधी आहे. मग आता जर पूर्ण गोपनीयतेच्या जागी सशर्त गोपनीयता वापरायचं ठरवलं तर मग एचआयव्हीची चाचणी करण्यास कोणी तयार होईल का? आपण एचआयव्हीसंसर्गित आहोत हे जोडीदाराला सांगितल्यावर जोडीदाराला धक्का बसतो. नात्यात अंतर पडतं, भांडणं होतात, शिव्याशाप दिले जातात. लहान मुलं असतील तर अजनूच ताण वाढतो. राग, विश्वासघात, उद्ध्वस्त झालेली स्वप्नं या सर्वांमुळे काही दिवस बोलणंही बदं होतं. जोडीदाराची एचआयव्हीची चाचणी करून जोडीदाराला एचआयव्हीची लागण आहे का? हे तपासावं लागतं. (काही वेळा जर बायकोसुद्धा एचआयव्हीसंसर्गित झाली असेल तर आपल्याला बायको दोष देऊ नये म्हणून तिच्यामुळेच आपल्याला लागण झाली असा आरोप नवरा तिच्यावर करतो.). एचआयव्हीसंसर्गित व्यक्तीला अपराधीपणाची भावना असते. जर बायकोला एचआयव्हीची लागण झालेली नसेल, तर संभोगातून आपल्याला एचआयव्हीची लागण होईल याची तिला धास्ती असते. अशा वातावरणात काही काळ दोघांमध्ये संभोग होत नाही. डॉ.रमण गंगाखेडकर म्हणाले, "पण हे किती दिवस? साहजिक आहे की कालांतराने दोघंजण नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात. काही काळानंतर त्याला व बायकोला लैंगिक सुखाची इच्छा होणार. इच्छा झाली तरी तिला आपल्या जिवाला जपायचं असतं. पण काही वेळा नवरा ऐकतच नाही. सक्षम असलेल्या बायका संभोगास नाही म्हणतात पण अनेकजण हतबल होऊन राजी होतात. जी स्त्री जीव मुठीत धरून संभोग करते तिचा तो अनुभव किती सुखकारक असणार?" एक ताई म्हणाल्या, “यांना (नवरा एचआयव्हीसंसर्गित आहे) इच्छा असते माझ्याबरोबर (सेक्स) करायची पण मलाच धजत नाही. लहान पोरं आहेत. मलाही हा रोग झाला तर त्यांच्याकडे कोणी बघायचं? पण मी यांच्याबरोबर नाही केलं (सेक्स) तर हे बाहेर जातात. पूर्वी जात होते तसंच." एचआयव्हीसंसर्गित व्यक्तीपासून जोडीदारास लागण होऊ नये म्हणून अनेक कॉन्सेलर्स जोडप्यांना 'निरोध वापरत जा' असं सुचवतात. हा एक पर्याय म्हणून पुढे ठेवण्यास हरकत नाही पण संभोगात निरोध फाटला तर जोडीदाराला आपल्यापासून एचआयव्हीची लागण होईल या काळजीमुळे संभोग करण्यास भीती वाटणं स्वाभाविक आहे. मला अनेक एचआयव्हीसंसर्गित व्यक्ती विचारतात, की “एचआयव्हीसंसर्गित व्यक्तीने संभोग करावा का?" लैंगिक सुखाची गरज सर्वांना आहे. यात एचआयव्ही संसर्गित व्यक्ती अपवाद नाहीत. जर जोडीदारांमधील एकच व्यक्ती एचआयव्हीसंसर्गित असेल तर दोघांनाही संभोग करायची इच्छा असेल तरच संभोग करावा, जोडीदारावर जबरदस्ती केली जाऊ नये. जर संभोग करण्यास दोघं राजी असतील तर निरोधचा दरवेळी व व्यवस्थित वापर करावा. १७६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख