पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संभोग करतात अशांनी संभोगाच्या वेळी निरोध वापरण्याची खबरदारी घ्यावी. एमएसएम समूहाचे प्रमुख वर्ग -

समलिंगी पुरुष

  • उभयलिंगी पुरुष
  • परिस्थितीजन्य समलिंगी वर्तन करणारे (उदा.जेलमधील काही पुरुष,

काही सैनिक इत्यादी.) व्यवसाय (भिन्नलिंगी पुरुष वेश्या जे व्यवसाय म्हणून समलिंगी संभोग करतात.)

  • प्रायोगिक संभोग (वयात आल्यावर मुलांना लैंगिक पैलू नवा असतो.

शरीरसुख घ्यायची खूप इच्छा असते. अशा वेळी प्रायोगिक तत्त्वावर समलिंगी संभोग होऊ शकतो. उदा. बोर्डिंग स्कूलमध्ये). एचआयव्ही खालील मागांनी पसरत नाही एचआयव्ही विषाणू नाजूक आहे. तो हवेत जगू शकत नाही. दाढीच्या ब्लेडला एचआयव्ही संसर्गित व्यक्तीचं रक्त लागून, ते ब्लेड आपल्यासाठी वापरलं गेलं तर त्यातून आपल्याला एचआयव्ही होऊ शकत नाही. एचआयव्हीसंसर्गित व्यक्तीच्या घामातून, लाळेतून, डोळ्याच्या पाण्यातून, त्याच्या स्पर्शातून एचआयव्हीचा प्रसार होत नाही. म्हणजेच एचआयव्हीसंसर्गित व्यक्तीशी हस्तांदोलन करून, त्याच्या/तिच्या ताटात जेवून, तिचं चुंबन घेऊन (ड्राय,वेट किस), तिचे कपडे घालून दुसऱ्याला एचआयव्हीचा संसर्ग होत नाही. एचआयव्हीसंसर्गित व्यक्तीला डास चावला व तो डास दुसऱ्या व्यक्तीला चावला तरी त्या डासापासून दुसऱ्या व्यक्तीला एचआयव्ही संसर्ग होऊ शकत नाही. एचआयव्हीची चाचणी आपल्याला एचआयव्हीची लागण झाली आहे का? हे आपल्याला रक्ताच्या चाचणीतून कळू शकतं. काही ‘डायरेक्ट' चाचण्या आहेत- 'पीसीआर' (पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन), 'आयएफए' (इम्युनो फ्लोरेसन्स आसे). पण या चाचण्या खूप क्लिष्ट व महाग असल्यामुळे त्या संशोधनासाठी वापरल्या जातात. सामान्यतः एचआयव्हीची चाचणी ही 'इनडायरेक्ट' पद्धतीने केली जाते. उदा. 'एलायझा' (व क्वचित वेळा 'वेस्टर्न ब्लॉट'). 'एलायझा' चाचणीची किंमत कमी असल्यामुळे तिचाच मुख्यत: वापर केला जातो. या चाचण्यांची मर्यादा अशी, की एचआयव्हीची लागण झाल्यावर तीन महिन्यांच्या आत ही चाचणी केली, तर ती बिनचूक उत्तरं देईलचं असं नाही. म्हणून या तीन महिन्यांना गवाक्ष काळ' ('विंडो पिरीअड') म्हणतात. शेवटच्या असुरक्षित संभोगाच्या तीन महिन्यांनंतर या . मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १७३