पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संभोगाचा प्रकार एचआयव्ही बाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग करून जोडीदाराला एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता गुदमैथुन सगळ्यांत जास्त शक्यता (या संभोगात रिसेप्टिव्ह जोडीदाराला इन्सटिव्ह जोडीदारापेक्षा लागण होण्याचा जास्त धोका असतो). योनीमैथुन जास्त शक्यता (या संभोगात रिसेप्टिव्ह जोडीदाराला इन्सटिव्ह जोडीदारापेक्षा लागण होण्याचा जास्त धोका असतो.). मुखमैथुन खूप कमी प्रमाणात शक्यता. स्वत:चा हस्तमैथुन शून्य शक्यता. दोघांमधला हस्तमैथुन शून्य शक्यता. मांडीत लिंग घालून केलेला संभोग शून्य शक्यता. शरीर एकमेकांवर घासून केलेला संभोग (बॉडी सेक्स) शून्य शक्यता. चुंबन शून्य शक्यता. कृत्रिम लिंग वापरून शून्य शक्यता (इतर कोणाचे स्त्राव त्यावर नसतील तर). काहीजण विचारतात, की “एचआयव्ही संसर्गित पुरुषाने संभोग करताना वीर्यपतन होण्याआधी लिंग योनी/गुदद्वारातून बाहेर काढलं तर जोडीदाराला एचआयव्ही होण्याची शक्यता असते का?" हो. कारण वीर्यपतन होण्याआधी जे सफेद एक दोन थेंब येतात ('प्रीकम') त्यातही एचआयव्हीचा विषाणू असतो. दुसरं कारण असं की संभोग करताना लिंगाच्या घर्षणातून शिस्नमुंडाला, योनी/गुदाला अत्यंत सूक्ष्म छेद पडतात. या छेदातून रक्तातील एचआयव्हीचा विषाणू जोडीदारात जाऊ शकतो. एमएसएम (मेन हू हॅव सेक्स विथ मेन) व एचआयव्ही एचआयव्ही संसर्गित पुरुषाबरोबर दुसऱ्या पुरुषाने असुरक्षित संभोग केला, तर जोडीदाराला एचआयव्हीची लागण होऊ शकते. एका एचआयव्ही बाधित पुरुषाबरोबर, दुसऱ्या पुरुषाने असुरक्षित गुदमैथुन करण्याने दुसऱ्या पुरुषाला एचआयव्हीची लागण होण्याची खूप शक्यता असते. म्हणून जे पुरुष इतर पुरुषांबरोबर १७२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख