पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एआरटी (अँटि रेट्रोव्हारल थेरपी) 'एआरटी' औषधं घेऊन एचआयव्ही बरा होत नाही पण ती दररोज व आयुष्यभर घेऊन एचआयव्हीच्या वाढीवर नियंत्रण आणता येतं. एआरटी औषधं घेणं सुरू केल्यापासून एचआयव्ही संसर्गित व्यक्तीचं आयुष्य अंदाजे १५ वर्ष वाढतं. डॉक्टर सांगतील तशी आयुष्यभरासाठी दररोज, वेळेवर न चुकता एआरटी औषधं घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही औषधं मध्येच, अगदी दोन दिवस जरी घ्यायची सोडली तरी एचआयव्ही विषाणू रेझिस्टंट' बनतो. याचा अर्थ कालांतराने ती औषधं परत सुरू करून तिचा काहीही उपयोग होत नाही. या औषधांचे अनेक दुष्परिणाम आहेत. 'एआरटी' औषधं घेऊ लागल्यावर हळूहळू एचआयव्हीचं शरीरातील प्रमाण कमी होऊ लागतं व रोगप्रतिकारकशक्ती वाढू लागते. तब्येत सुधारायला लागते. एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमुख मार्ग १. ज्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झालेली आहे अशा व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग केल्याने जोडीदाराला एचआयव्हीची लागण होऊ शकते. २. एचआयव्ही बाधित व्यक्ती जर इंजेक्शनद्वारे नशा घेत असेल व त्याने वापरलेल्या इंजेक्शनचं निर्जंतुकीकरण न करता, दुसऱ्या व्यक्तीने नशा घेण्यासाठी वापर केला तर इंजेक्शनमध्ये असलेलं एचआयव्ही बाधित रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या रक्तात मिसळून त्याला एचआयव्हीची लागण होते. ३. एचआयव्ही बाधित व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिलं गेलं तर ज्या व्यक्तीला रक्त दिलं आहे त्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण होते. (रक्त दयायच्या अगोदर त्या रक्तात एचआयव्ही आहे का याची चाचणी केली जाते पण जर एचआयव्ही 'गवाक्ष काळ' ('विंडो पिरेड') मध्ये असेल तर या चाचणीला ते रक्त एचआयव्ही बाधित आहे हे ओळखता येत नाही.) ४. एचआयव्ही संसर्गित मातेच्या बाळंतपणाच्या वेळी मूल योनीतून बाहेर येताना/बाळंतपणानंतर त्या मातेने नवजात बालकाला स्तनपान केल्यामुळे बालकाला एचआयव्हीची लागण होऊ शकते. एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता किती आहे हे कोणत्या प्रकारचा असुरक्षित संभोग झाला आहे यावर अवलंबून असतं. जर एका गुप्तरोग बाधित व्यक्तीने एका एचआयव्ही बाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग केला तर, एचआयव्ही बाधित व्यक्तीकडून एचआयव्हीचा विषाणू सहजपणे गुप्तरोगाच्या जखमांतून गुप्तरोग बाधित व्यक्तीच्या आत शिरू शकतो व त्यामुळे गुप्तरोग बाधित व्यक्तीला एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता खूप वाढते. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १७१