पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यक्तींना बुरशी होण्याची शक्यता जास्त असते. अॅलोपॅथिक औषधांनी याच्यावर उपचार केला जातो. किटाणूंनी होणारे एसटीआय ट्रायकोमोनिअॅसिस 'ट्रायकोमोनस व्हजायनॅलीस' या किटाणूंची योनीत लागण झाली तर योनीतून पिवळसर, हिरवा स्राव येतो. योनीला खाज सुटते. लघवी करताना जळजळ होते. अॅलोपॅथिक औषधांनी उपचार केला जातो. एचआयव्ही/एड्स एचआयव्ही ('ह्यूमन इम्युनोडेफीशियन्सी व्हायरस') हा विषाणू आहे. त्याची लागण झाली की तो आपल्या रक्तातील विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशीत शिरतो. या पांढऱ्या पेशी आपली रोगप्रतिकारकशक्ती सांभाळतात. या पेशींचा आधार घेऊन हा विषाणू अजून नवीन विषाणूंची निर्मिती करतो. ती पांढरी पेशी नाश पावते व तिच्यातील वाढलेले एचआयव्ही विषाणू रक्तात मिसळतात. रक्तात मिसळलेला प्रत्येक एचआयव्ही विषाणू एका वेगळ्या पांढऱ्या पेशीत शिरतो. याप्रमाणे हळूहळू एचआयव्ही विषाणू वाढू लागतात व पांढऱ्या पेशी कमी होऊ लागतात. लागण झाल्यावर सुरुवातीची अनेक वर्ष कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. कालांतराने जसजशी रोगप्रतिकारकशक्ती कमी होते तसतसे विविध आजार होऊ लागतात. शेवटी रोगप्रतिकारकशक्ती पूर्णपणे नष्ट होते व 'एआरटी औषधं घेतली नाहीत तर ती व्यक्ती विविध संधिसाधू आजारांनी मृत्यू पावते. या शेवटच्या टप्प्याला 'एड्स' म्हणतात (अॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम). संधिसाधू आजार (ओआय-ऑपॉर्म्युनिस्टिक इंन्फेक्शन्स) जसजसा एचआयव्ही विषाणू शरीरात वाढतो तसतसे विविध संधिसाधू आजार होऊ लागतात. उदा. जुलाब, न्यूमोनिया, क्षयरोग इत्यादी. जर मेंदूचे आजार झाले तर स्मरणशक्ती कमी होणं, दृष्टीत, बोलण्यात, चालण्यात फरक पडणं असे परिणाम दिसतात. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीने कोणतेही संधिसाधू आजार अंगावर काढू नयेत. एचआयव्हीबद्दल जाणकार डॉक्टरांकडून त्वरित उपचार घ्यावेत. एचआयव्ही संसर्गित स्त्रियांनी दरवर्षी एकदा 'पॅप स्मियर' ची चाचणी करून घ्यावी. दरवर्षी 'सीडी ४' ची चाचणी करून आपल्या रोगप्रतिकारकशक्तीबद्दल माहिती मिळवावी. 'सीडी ४' जर २५० पेक्षा कमी झाला तर 'एआरटी' औषधं सुरू करावी लागतात. १७० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख