पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असा समाजात समज आहे. हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. अॅलोपॅथिक औषधांनी हा आजार बरा होतो, पण विषाणू शरीरात तसाच राहतो व अधूनमधून रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली, की ही लक्षणं परत दिसू शकतात. लक्षणं दिसायच्या अगोदर हा आजार परत डोकं वर काढणार आहे हे त्या व्यक्तीला जाणवतं. जिथे फोड येणार तिथे चूरचूर व्हायला लागते. असं जाणवलं की लगेच डॉक्टरांकडे जाऊन औषध घ्यावं. अशी लक्षणं दिसत असताना असुरक्षित संभोग झाला तर जोडीदाराला या विषाणूची लागण होण्याची खूप शक्यता असते. गर्भार मातेला लागण झाली तर गर्भालाही त्याची लागण होऊ शकते. जेनायटल वार्ट्स 'जेनायटल वार्ट्स' हे 'ह्यूमन पॅपिलोमा' विषाणूंची लागण होऊन होतात. ही लागण झाल्यावर जननेंद्रियांवर वेदनारहित चामखीळ ('फ्लॉवर' सारखे कोंब) येते. या आजारावर कोणतंही औषधं नाही. एक विशिष्ट रसायन लावून हे कोंब जाळून टाकावे लागतात किंवा फार वाढले तर ते शस्त्रक्रिया करून काढून टाकावे लागतात. ते जाळले किंवा काढले तरी ते परत वाढू शकतात. या विषाणूचा लिंगाच्या व गर्भाशयमुखाच्या कर्करोगाशी संबंध आहे. 'जेनायटल वार्ट्स' झाले की लगेच अॅलोपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व जननेंद्रियांवर कोंब असताना संभोगाच्या वेळी न चुकता निरोधचा वापर करावा, हेपॅटिटीस बी बाधित व्यक्तीपासून असुरक्षित संभोगातून 'हेपेंटिटीस बी' विषाणूची लागण होऊ शकते. याच्यामुळे ताप येणं, भूक कमी होणं, मळमळायला होणं, उलट्या होणं, अंग दुखणं, लघवीला पिवळी होणं, अशी लक्षणं दिसू शकतात. हा काविळीचा प्रकार आहे. अॅलोपॅथिक औषधं घेऊन लक्षणं गेली तरी हा विषाणू शरीरात आयुष्यभर राहतो. या आजारावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. बुरशी कैंडिडीयासिस शरीराच्या विविध भागांवर बुरशी (कैंडिडा अब्लिकॅन्स) येऊ शकते. काखेत, तोंडात, जिभेवर, मांड्यांच्या आतल्या भागात, लिंगावर, वृषणावर, योनीत, भगोष्ठांवर इत्यादी. पांढरा किंवा पिवळा बुरशीचा थर कातड्यावर दिसायला लागतो. योनीत या बुरशीची वाढ झाली तर योनीतून दयासारखा फेसाळ स्राव येतो व योनीला खाज सुटते. बुरशीची वाढ झालेल्या व्यक्तीने वापरलेले कपडे, टॉवेल, टूथब्रश या वस्तूंचा न धुता दुसऱ्या व्यक्तीने वापर केल्यास या बुरशीचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. मधुमेह असलेल्यांना व एचआयव्ही संसर्गित मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १६९