पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'एक्टोपिक' गर्भधारणा होऊ शकते. मृत मूल जन्माला येणं, लवकर प्रसूती होणं असे परिणामही दिसतात. जर परमा असलेल्या व्यक्तीवर असुरक्षित मुखमैथुन केला, तर परमाची लागण घशात होऊ शकते. याच्यामुळे 'टॉन्सिल्स' ना सूज येणं, घसा दुखणं असे परिणाम दिसतात. जर असुरक्षित गुदमैथुनातून स्वीकृत जोडीदाराला परमाची लागण झाली तर जुलाब, संडास करताना वेदना होणं, संडासावाटे रक्त जाणं, पातळ संडास होणं अशी लक्षणं दिसतात. अॅलोपॅथिक औषधांनी हा आजार बरा होतो. शैक्रॉइड (मृदुव्रण) या जिवाणूची लागण झाली की आठवड्यात जननेंद्रियांवर वेदनादायक जखमा होतात. जखमांच्या स्थानानुसार लघवी/शौच व संभोग करताना वेदना होतात. गुदद्वारात जखमा असतील, तर गुदद्वारातून रक्त जातं. जांघेतील लसिका ग्रंथी वेदनादायक बनतात. अॅलोपॅथिक औषधं घेऊन हा आजार बरा होतो. लिंफोग्रॅन्यूलोमा व्हेनेरम (एल.जी.व्ही) (बद) याची लागण होऊनही अनेकजणांमध्ये कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. काहींना याची लागण झाली, की शिस्नमुंडावर एखादा न दुखणारा फोड येतो. तो कालांतराने जातो. नंतर काही दिवसांनी जांघेत ('इंगुआयनल लिंफ नोड्स') सूज येते. ही सूज दुखणारी असते. सुजेवरचं कातडं लाल दिसायला लागतं व गरम जाणवतं. चालताना त्रास होतो. थोड्या दिवसांनी या सुजेत पू भरतो. ही सूज फुटली, की तिथे जखम होते. जखम भरायला वेळ लागतो. जर गुदमैथुनातून स्वीकृत जोडीदाराला या जिवाणूंची लागण झाली तर गुदद्वाराला खाज सुटणं, संडास करताना दुखणं, गुदमार्ग अरुंद होऊन संडास पेन्सिलीसारखी बारीक येणं, गुदद्वारातून स्त्राव जाणं, अशी लक्षणं दिसतात. अॅलोपॅथिक औषधांनी हा आजार बरा होतो. विषाणूंनी होणारे एसटीआय जनायटल हरपीज याचे विषाणू दोन प्रकारचे आहेत. एचएसव्ही १ व एचएसव्ही २. जननेंद्रियांवरची हरपीज ही सहसा एचएसव्ही १ मुळे होते. याची लागण झाली की जळजळ करणारे व दुखणारे छोटे छोटे पाण्याने भरलेले फोड जननेंद्रियांवर उमटतात. हे चेतापेशी'चं इन्फेक्शन असल्यामुळे ते त्या चेतापेशी' च्या मार्गानं पसरतं. सावधान : काहीजण या आजाराला जननेंद्रियांवरची नागीण असंही म्हणतात. पण लक्षात ठेवा की नागीणीची लागण ही संभोगातूनच होते असं नाही. दुसरी गोष्ट जर नागीण पूर्ण शरीराभोवती विळखा घालून जोडली गेली तर ती व्यक्ती मृत्यू पावते १६८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख