पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होतात, काही विषाणूंमुळे (व्हायरस) होतात, काही बुरशीमुळे (फंगस) होतात व काही किटाणूंमुळे (प्रोटोझुआ) होतात. यातील बहुतेक सर्वांवर अॅलोपॅथिक औषधं आहेत. विषाणूंमुळे होणारे एसटीआय औषधं घेऊन नियंत्रणात येतात पण शरीरातील विषाणू नष्ट होत नाहीत. कालांतरानं रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली तर तो एसटीआय परत दिसू शकतो (उदा.जनायटल हरपीज). खाली काही मोजक्या एसटीआयची संक्षिप्त माहिती दिली आहे. यातील काही माहिती 'यौवनाच्या उंबरठ्यावर' या पुस्तकातून घेतली आहे. जिवाणूंनी होणारे एसटीआय बॅक्टेरियल व्हजायनोसिस योनीत अनेक जिवाणू असतात. जर काही कारणांनी यातील एका विशिष्ट जिवाणूची प्रमाणाबाहेर वाढ झाली तर योनीतून वास येणारा स्राव येऊ लागतो. अॅलोपॅथिक औषध घेऊन हा आजार बरा होतो. हा आजार लैंगिक संबंधातूनच होतो असं नाही. गर्मी (सिफिलीस) गर्मीच्या जिवाणूंची (ट्रिपोनेमा पॅलिडियम) लागण झाली तर काहीजणांच्या जननेंद्रियांवर न दुखणारे एक-दोन फोड येतात. उपचार केले नाही तरी काही आठवड्यांत ते फोड जातात. फोड दिसेनासे झाले तरी शरीरात ते जिवाणू वाढत राहतात. काही महिन्यांनंतर छातीवर, पाठीवर लाल पुरळ उठतात. हा गर्मीचा दुसरा टप्पा असतो. काही दिवसांनी हे पुरळ आपोआप जातात. याच्यापुढे काही महिन्यांनंतर, वर्षांनंतर या जिवाणूंमुळे हृदयविकार किंवा अर्धांगवायू होऊ शकतो. गर्भार मातेला गमींची लागण झाली असेल, तर तिच्यापासून तिच्या गर्भालाही गर्मीची लागण होते. गर्भ पडणे, मृत मूल जन्माला येणे असे परिणाम दिसतात. रक्ताची चाचणी करून या एसटीआयचं निदान करता येतं. वेळेवर अॅलोपॅथिक इंजेक्शन/औषधं घेऊन गर्मी -एसटीआय पूर्णपणे बरा होऊ शकतो. परमा (गोनोरिया), क्लमायडिया 'निसेरिया गोनोरिया' या जिवाणूंनी परमा होतो व 'क्लमायडिया ट्रॅकोमॅटिस' ने 'क्लमायडिया' होतो. अनेक वेळा दोघांची लागण एकदम होते. दोघांमुळे दिसणारी काही लक्षणंही सारखी आहेत. औषधोपचारही तेच आहेत. यांची लागण झाली, की लिंग किंवा योनीतून वास येणारा स्राव येतो. लघवी करताना जळजळ होते, कधीकधी पुरुषाचं एक वृषण सुजतं. काही वेळा डोळे लाल होतात, सांधे दुखतात. स्त्रीला लागण झाली तर तिला वंध्यत्व येऊ शकतं. या जिवाणूंच्या संसर्गामुळे मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख 7 १६७