पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८. छोटी रिंग योनीमुखाजवळ आली की ती बोटांनी पकडून तिला '8' आकड्यासारखा पीळ देऊन निरोध पूर्णपणे बाहेर काढावा. ९. निरोध कागदात गुंडाळून कचऱ्याच्या पेटीत टाकावा, संडासात टाकू नये, त्याने संडास तुंबू शकतो. - जर स्त्री निरोध गुदमैथुनासाठी वापरायचा असेल तर - १. निरोध गुदात घालायच्या अगोदर त्याच्या आतील छोटी रिंग काढून बाजूला ठेवावी. २. निरोधात एक बोट घालून निरोध गुदात घाला. निरोधाची मोठी रिंग गुदद्वारावर बसेल. ३.संभोग झाल्यावर मोठ्या रिंगला एक-दोन पीळ दयावेत व निरोध बाहेर काढावा. - स्त्री-निरोधचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, पुरुषाला निरोध चढवायचा नसेल तर आजवर स्त्रीला एसटीआय/एचआयव्हीपासून कोणतंच संरक्षण नव्हतं. आता पुरुषानी निरोध नाही वापरला तर स्त्रीनं स्त्रीचा निरोध वापरून संरक्षण मिळवता येतं. म्हणून वेश्या व्यवसायात असलेल्या स्त्रियांना काही संस्था स्त्री-निरोध स्वस्त दरात पुरवतात. या निरोधचे काही तोटेही आहेत. निरोध व्यवस्थित बसवायची थोडी सवय व्हावी लागते. हा निरोध वापरून संभोग करताना थोडा आवाज होऊ शकतो. स्त्री निरोध घातल्यावर स्त्रीवर मुखमैथुन करताना निरोधचा अडथळा होऊ शकतो. हा निरोध महाग आहे. तो मोजक्या ठिकाणी उपलब्ध आहे. एकदा वापरल्यावर तो परत वापरायचा नसतो. स्त्रीनं स्त्री-निरोध बसवून एका मागोमाग एक असा अनेक पुरुषांबरोबर संभोग केला पण प्रत्येक पुरुषानंतर निरोध बदलला नाही तर पुरुषांपासून एसटीआय/एचआयव्हीचं तिला संरक्षण मिळतं, पण पुरुषाच्या लिंगाला अगोदर संभोग केलेल्या पुरुषाचं वीर्य लागतं (जे स्त्री-निरोधात राहिलेलं असतं). म्हणून त्या वीर्यात जर एसटीआय/एचआयव्हीचे जिवाणू/विषाणू असतील तर नंतरच्या पुरुषाला याची लागण होण्याची शक्यता असते. एसटीआयची माहिती जगात अनेक प्रकारचे एसटीआय आहेत. काही जिवाणूंमुळे (बॅक्टेरिया) १६६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख