पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रीचा निरोध स्त्रीचा निरोध ही पॉलीयुरेथेन किंवा लॅटेक्स रबराची पिशवी आहे. तिला दोन रिंगा असतात. तोंडापाशी एक मोठी रिंग असते ती निरोधशी एकसंघ असते. दुसरी एक छोटी रिंग निरोधच्या आत असते जी बाहेर काढता येते. स्त्रीचा निरोध स्त्रीच्या योनीत बसवायचा असतो. १ स्त्री-निरोध वापरायची योग्य पद्धत १. संभोगाच्या वेळी दोघांनी (स्त्रीनं व पुरुषानं) एकाच वेळी निरोध वापरू नये. म्हणजे पुरुष निरोध वापरत असेल तर स्त्रीनं निरोध वापरू नये. २. स्त्री-निरोध संभोगाच्या अर्धा तास अगोदर स्त्रीनं बसवायचा असतो. ३. स्त्री-निरोध बसवण्यासाठी स्त्रीनं खुर्चीवर पाय फाकवून बसावं किंवा 'स्क्वंटिंग पोझिशन' मध्ये बसावं. ४. निरोधातील छोट्या रिंगचा '8' चा आकडा करून तो योनीत घालावा. ५. एका बोटाचा वापर करून ती छोटी रिंग योनीत जेवढी आत जाईल तेवढी आत घालावी. निरोधची मोठी रिंग योनीवर बसेल. ६. संभोगाच्या वेळी पुरुषाचं लिंग आत जाताना ते स्त्रीच्या निरोधात जात आहे याची खात्री करावी (चुकून लिंग मोठ्या रिंगच्या बाहेरच्या बाजूने आत गेलं तर निरोध वापरण्याचा काही उपयोग होत नाही.). ७. संभोग होऊन लिंग बाहेर काढल्यावर मोठ्या रिंगला एक-दोन पीळ दयावेत व निरोध बाहेर काढायला लागावं. ४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १६५