पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

योनीमैथुनासाठी वापरू नये कारण त्याने योनीतील जिवाणूंचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. याच्या व्यतिरिक्त रात्री चकाकणारे निरोध, सुगंधी निरोध, रेघा असलेले (रिब्ड) निरोध, ठिपके असलेले (डॉटेड) निरोध, असे विविध प्रकारचे निरोध बाजारात मिळतात. रिब्ड/डॉटेड निरोधमुळे गुदमैथुन करताना स्वीकृत जोडीदारास त्रास होऊ शकतो. डबल निरोधचा वापर काहीजणं सुरक्षिततेसाठी डबल निरोधचा वापर करतात. दोन निरोध वापरायचे की नाही याबद्दल दुमत आहे. काहीजण सांगतात की एका वेळी एकच निरोध वापरावा. दोन वापरले तर एका वर एक निरोध घासून निरोध फाटायची शक्यता असते. काहीजण सांगतात, की "आम्ही डबल निरोध वापरतो. त्यातला एक फाटला तरी दुसऱ्यामुळे संरक्षण मिळतं.” दोन निरोध वापरल्यानं पुरुषाला संवेदनशीलता कमी जाणवते. वंगण (लुब्रिकंट) संभोगाच्या वेळी घर्षणाने निरोध फाटू नये म्हणून निरोधला वंगण लावलेलं असतं. हे वंगण पाणी आणि ग्लिसरीन यांनी बनवलेलं असतं. गुदमैथुनासाठी निरोधचं वंगण पुरेसं नसतं, म्हणून जास्त वंगण वापरण्याची जरूर पडते. तसेच जर योनीला कोरडेपणा असेल (विशेषतः रजोनिवृत्ती आल्यावर) तर जास्त वंगणाची जरूर पडते. वंगणामुळे घर्षण कमी होतं. स्वीकृत जोडीदाराला त्रास कमी होतो व निरोध फाटायची शक्यताही कमी होते. ज्या वंगणाने शरीराला अपाय होणार नाही, घर्षण कमी होईल आणि ज्यामुळे निरोध फाटणार नाही असं वंगण वापरलं पाहिजे. अनेक पुरुष तेलयुक्त वंगणाचा सर्रास वापर करतात. याच्यामुळे निरोधची ताकद कमी होते व निरोध फाटायची शक्यता वाढते. म्हणून तेलयुक्त वंगण वापरू नये. तेल, तूप, क्रीम (उदा. वॅसलीन, ओडोमॉस इत्यादी), मशीनचं वंगण (ग्रीस), साखरेचा पाक, आइस्क्रीम, जॅम व तेल/तूप वापरून केलेला कोणताही पदार्थ वंगण 7 म्हणून वापरू नये. 'केवाय जेली' पाणी व ग्लिसरीनने बनवलेली असते. हे वंगण म्हणून वापरावं. हे वंगण मेडिकलच्या दुकानात मिळतं. याच्या व्यतिरिक्त गुदमैथुनासाठी मध, कोरफडीचा गर वंगण म्हणून वापरू शकता. थुकीचा वंगण म्हणून फार उपयोग होत नाही. योनीमैथुनासाठी मध, कोरफडीचा गर वंगण म्हणून वापरू नये कारण त्याने योनीतील जिवाणूंचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. १६४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख