पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ करताना निरोध फाटू शकतो. म्हणून निरोधचं टोक चिमटीत पकडा म्हणजे हवा बाहेर पडेल व तशीच चिमूट पकडून निरोध लिंगावर चढवा. ७. निरोध लिंगावर पूर्णपणे चढवा. अर्धवट चढवू नका. ८. संभोग करताना निरोध फाटलाय अशी शंका आली तर लगेच थांबा व लिंग बाहेर काढा. नवीन निरोध चढवा व मगच संभोग परत सुरू करा. ९. वीर्यपतन झाल्याबरोबर लिंग ताठ असतानाच निरोधची कड पकडून लिंग व निरोध (योनी/गुदातून) बाहेर काढा. १०. लिंगावरून निरोध काढताना वीर्य योनी किंवा गुदावर सांडणार नाही याची काळजी घ्या. ११. निरोधला गाठ मारा. १२. निरोध कचऱ्याच्या कुंडीत टाकून दया. संडासात टाकू नका. संडास तुंबू शकतो. १३. गुदमैथुन केल्यानंतर योनीमैथुन करणार असाल किंवा योनीमैथुनानंतर गुदमैथुन करणार असाल, तर संभोगाचा प्रकार बदलतेवेळी न चुकता निरोध बदलायची खबरदारी घ्यावी. निरोध व्यवस्थित वापरला तर संभोगाच्या दरम्यान निरोध फाटायची शक्यता अंदाजे २ ते ३% असते. ५ निरोधचे प्रकार निरोधचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. मुखमैथुनासाठी 'फ्लेवर्ड' निरोध (उदा. चॉकलेट, स्ट्रॉबेरी, बनाना चवीचं वंगण असलेले निरोध). या निरोधच्या वंगणाला विविध प्रकारची चव असते. शक्यतो फ्लेवर्ड निरोध मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १६३