पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

> आपण त्याच्या/तिच्याबरोबर असुरक्षित संभोग केल्यानं आपल्याला एसटीआय/एचआयव्हीची लागण होत नाही, पण जोडीदाराला एसटीआय/एचआयव्हीची लागण आहे की नाही हे अनेक वेळा लक्षणं दिसत नसल्यामुळे कळत नाही. म्हणून निरोध वापरण्याची सावधगिरी. "आम्हाला असं काही होणार नाही.","एकदाच असुरक्षित संभोग केल्याने एसटीआय किंवा एचआयव्हीची लागण कशी काय होईल?", "ती व्यक्ती सशक्त दिसत होती. तिला कुठलाही आजार नसणार," "ती वरच्या वर्गातील होती, तिला असं काही नसणार", अशा भाबड्या समजुर्तीमुळे अनेकजण एचआयव्ही संसर्गित झाले आहेत. पुरुष-निरोध वापरण्याची योग्य पद्धत १. निरोधच्या वेष्टनावरची कालबाह्य तारीख ('एक्सपायरी डेट') तपासा. जर निरोध कालबाह्य झाला असेल तर तो वापरू नका. दुसरा वापरा. इतर कोणताही निरोध उपलब्ध नसेल तरच कालबाह्य झालेला निरोध वापरा. २. जर तारीख वाचता येत नसेल, तर निरोध पाकिटात सरकवण्याचा प्रयत्न करा. तो सहज सरकत असेल तर निरोध वापरण्यास हरकत नाही असं समजा, जर निरोध पाकिटात सहजपणे सरकत नसेल तर त्यातील वंगण वाळलं आहे व तो निरोध शक्यतो वापरू नये. ३. निरोधाचं पाकीट फाडायच्या अगोदर पाकिटातला निरोध एका बाजूला सरकवावा व दुसऱ्या बाजूनं (ज्या बाजूला निरोध नाही) पाकीट फाडा, म्हणजे पाकीट फाडताना तुमचं नख लागून निरोध फाटणार नाही. ४. निरोध पाकिटातून काढल्यावर त्याच्यावर कुंकर मारून तो कोणत्या दिशेनं उलगडायचा हे बघून घ्या. ५. लिंग पूर्ण उत्तेजित झाल्याशिवाय लिंगावर निरोध चढवू नका, अन्यथा तो लिंगावर नीट बसत नाही. ६. निरोधच्या टोकात हवा साठलेली असू शकते. तशीच हवा ठेवून जर निरोध लिंगावर चढवला तर संभोग १६२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख