पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्तन सांगणं गरजेचं आहे. अनेक वेळा असं दिसतं, की कॉन्सेलर व डॉक्टर एसटीआय घेऊन आलेल्या व्यक्तीशी संवेदनशीलपणे बोलत नाहीत. जर ती व्यक्ती समलिंगी किंवा ट्रान्सजेंडर असेल किंवा वेश्या असेल तर अशा व्यक्तीला तुच्छ वागणूक दिली जाते. म्हणून अनेकजण उपचार घ्यायचं टाळतात. कॉन्सेलर व डॉक्टरांनी कोणताही पूर्वग्रह न बाळगता संवेदनशीलपणे पेशंटशी वागलं पाहिजे तरच पेशंट मोकळेपणानं बोलेल. काही विशिष्ट एसटीआयवर वेळेवर व योग्य उपचार घेतले नाहीत, तर हे एसटीआय गंभीर रूप धारण करू शकतात. उदा. गर्मी (सिफिलीस) मुळे शेवटच्या टप्प्यात अधांगवायू किंवा हृदयविकार होऊ शकतो. म्हणून वेळेवर उपचार घ्यावेत. आजार अंगावर काढू नये. उपचार जाणकार अॅलोपॅथिक डॉक्टरांकडूनच घ्यावेत. भोंदू वैदूंकडून औषधं घेऊ नयेत. ज्या व्यक्तीला एसटीआय झालेला आहे, त्यांनेच फक्त उपचार घेणं पुरेसं नाही. त्या व्यक्तीचा जो/जी जोडीदार आहे (मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो) त्यांचीही तपासणी करून घेणं गरजेचं आहे, कारण जर जोडीदारालासुद्धा लागण असेल व फक्त एकानंच औषध घेतलं तर, बरं झाल्यावर परत जोडीदाराबरोबर असुरक्षित संभोग करून ती लागण परत होते. म्हणून दोघांचीही तपासणी करणं व गरजेनुसार उपचार घेणं महत्त्वाचं आहे. उपचार पूर्ण करावेत. औषधांचा कोर्स अर्धवट सोडू नये. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या कालावधीत आपल्या जोडीदाराला आपल्या एसटीआयची लागण होऊ नये म्हणून संभोगाच्या वेळी नेहमी व व्यवस्थित प्रकारे निरोधचा वापर करावा. निरोध (कंडोम) गर्भनिरोधक साधनांमधले फक्त पुरुष व स्त्री निरोध असे आहेत जे संतती नियमनास मदत करतात व त्याचबरोबर एसटीआय/एचआयव्ही/एड्सपासून संरक्षण देतात. पुरुषाचा निरोध पुरुषाचा निरोध ही एक लॅटेक्स रबराची एका बाजूला बंद असलेली नळी आहे, जी लिंगावर चढवायची असते. लिंग-योनीमैथुन, मुखमैथुन व गुदमैथुन या तिन्हीं मैथुनात पुरुष-निरोधचा वापर करता येतो. अनेकजण "कंडोमनी मजा येत नाही", "नैसर्गिक वाटत नाही", ही सबब सांगतात. हे खरं असलं तरी आपल्या स्वास्थ्याला किती महत्त्व यायचं हे ज्यानी त्यानी ठरवावं. जर जोडीदाराला एसटीआय/एचआयव्हीची लागण नसेल, तर मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १६१