पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तर त्याची लक्षणं दिसतीलच व लक्षणं नसतील तर एसटीआय नसणार. एसटीआय असूनसुद्धा लक्षणं दिसतीलच असं नाही हे कळल्यावर ते अस्वस्थ झाले. जर एखाद्या व्यक्तीला (स्त्री किंवा पुरुष) एसटीआय असेल व त्या व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग झाला तर त्या व्यक्तीचा एसटीआय जोडीदाराला होऊ शकतो. एसटीआय पुरुषांना व स्त्रियांना दोघांनाही होऊ शकतात. एसटीआय बाधित व्यक्तीशी असुरक्षित योनीमैथुन, मुखमैथुन किंवा गुदमैथुन करून पसरतात. एकाचवेळी एकापेक्षा अनेक एसटीआयचीही लागण होऊ शकते. एसटीआयबाधित व्यक्तीपासून, असुरक्षित भिन्नलिंगी संभोगातून, तसंच असुरक्षित समलिंगी संभोगातून एसटीआय पसरू शकतात. काही वेळा एसटीआय झाला की त्याची लक्षणं दिसतात. लागण झाल्यावर कधी एका आठवड्यात दिसतात तर कधी दीड-दोन महिन्यांनीही दिसू शकतात, पुरुष व स्त्रिया यांच्यामधील एसटीआयची लक्षणं फोड - जननेंद्रियांवर (योनी, लिंग, वृषण, गुदद्वार) फोड येणं, फोडाचे अनेक प्रकार आहेत: एक किंवा अनेक, छोटे किंवा मोठे, पाण्याने भरलेले किंवा कोरडे, जळजळ करणारे किंवा न जळजळ करणारे, दुखणारे किंवा न दुखणारे. गाठी - जांघेत दुखणाऱ्या गाठी, त्यात काही दिवसांनी पाण्यासारखा स्राव होतो. जळमा - योनीवर, लिंगावर, वृषणावर, गुदद्वाराच्या जागी जखमा. नाव - योनी, लिंगाद्वारे दुगंधीयुक्त नाव. जळजळ - लघवी करताना जळजळ होणं. रक्त-संडासवाटे रक्त जाणं. संभोग करताना वेदना होणं. स्त्रियांच्या ओटीपोटात दुखणं. सावधान - जननेंद्रियांवर दिसणारी विविध लक्षणं एसटीआयचीच असतील असं नाही. लक्षणं इतर कारणांमुळेही असू शकतात. उदा.१ गुदद्वारात कोंब हे मूळव्याधीचे असू शकतात. उदा.२ योनीतलं विशिष्ट जिवाणूंचं संतुलन बिघडल्यामुळे योनीतून वास येणारा नाव येऊ शकतो. त्यामुळे ही लक्षणं दिसली तर आपल्याला एसटीआय झाला आहे असा आपणच तर्क काढू नये. अॅलोपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एसटीआय हा फक्त गुप्तांगांवरच होतो असं नाही. तो इतरत्रही होऊ शकतो. उदा. जर एखादया पुरुषाला परमा (गोनोरिया), एसटीआयची लागण झाली असेल व जोडीदारानं त्या पुरुषावर असुरक्षित मुखमैथुन केला, तर जोडीदाराच्या घशात परमाची लागण होऊ शकते. म्हणून डॉक्टरांना दाखवताना त्यांना स्पष्टपणे लैंगिक १६० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख