पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रक्तदाब ज्यांना रक्तदाबाचा आजार असतो, अशांना रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी विविध औषधं दिली जातात. काही औषधं रक्तवाहिन्यांचा व्यास वाढवून रक्तदाब कमी करतात. यातील काही औषधांमुळे लिंगाला उत्तेजना येण्यास, वीर्यपतन होण्यास अडचण होऊ शकते. जसजसं वय वाढतं तसतसं चरबीमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात (जसा पाण्याच्या पाईपमध्ये गंज चढून पाण्याचा प्रवाह कमी होतो तसंच). त्यामुळे लिंगाला रक्ताचा प्रवाह कमी होऊन लिंगाला ताठरपणा येण्यास अडचण येऊ शकते. हृदयाचा झटका हृदयाचा झटका येऊन गेल्यावर रुग्णाला संभोग करताना हृदयावर ताण पडून परत हृदयाचा झटका येईल याची भीती असते. हीच भीती त्याच्या/तिच्या जोडीदारालाही असते, म्हणून अशा व्यक्तींबरोबर संभोग करण्यास जोडीदार घाबरतो. हृदयाचा झटका येऊन गेल्यावर संभोग करण्यास कधी सुरुवात करायची? काही औषध घ्यायचं का? या गोष्टी डॉक्टरांना नि:संकोचपणे विचाराव्यात. क्षयरोग (टीबी) क्षयरोगाचा जिवाणू ('मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलॉसिस') श्वासातून आपल्या फुफ्फुसात जातो व तिथे वाढून छातीचा क्षयरोग होतो (पल्मनरी टीबी). खोकला होणं, छातीत दुखणं, खोकताना बेडकं पडणं, प्रगत अवस्थेत बेडक्याबरोबर तोंडातून रक्त पडणं अशी लक्षणं दिसतात. बेडकाची चाचणी व छातीचा एक्सरे काढून छातीच्या क्षयरोगाचं निदान करता येतं. काही वेळा फुफ्फुसातून हे जिवाणू रक्तवाहिन्यात जाऊन रक्तातून इतर अवयवांत पसरतात. त्यामुळे काहीजणांना शरीराच्या इतर अवयवात क्षयरोग होऊ शकतो. (एक्स्ट्रापल्मनरी टीबी) उदा. पोटाचा, हाडाचा, मेंदूचा, जननेंद्रियांचा क्षयरोग, एचआयव्ही संसर्गित व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती खालावल्यामुळे अनेक एचआयव्ही संसर्गित व्यक्तींमध्ये क्षयरोग आढळून येतो. 'डॉट्स' ची (डायरेक्टली ऑब्झर्वड् ट्रीटमेंट शॉर्टटर्म) औषधं सहा ते आठ महिने न चुकता घेऊन क्षयरोगावर इलाज करता येतो. डॉट्सची औषधं सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. या औषधांचे काही दुष्परिणाम आहेत. उदा. मळमळणं, अॅसिडीटी होणं इत्यादी. या औषधांनी स्त्रीचं मासिक पाळी चक्र बिघडू शकतं. पुरुषांच्या लैंगिक उत्तेजनेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पुरुषाला जननेंद्रियांचा क्षयरोग झाला तर तो मूत्रपिंड, पूरस्थ ग्रंथी, वीर्यकोष, मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १५३