पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृषण व क्वचित वेळा लिंगात पसरतो. मूत्रमार्ग अरुंद होऊ शकतो, जननेंद्रियांत गाठ होऊ शकते. पुरुषबीज निर्मितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. स्त्रियांमध्ये जननेंद्रियांचा क्षयरोग झाला तर तो स्त्रीबीजांडात, गर्भाशयात व योनीत पसरू शकतो. अशा वेळी ओटीपोटात दुखणं, योनीतून अवेळी रक्तस्राव होणं, वंध्यत्व येणं असे परिणाम दिसू शकतात. जननेंद्रियांचे कर्करोग भारतात स्त्रियांमध्ये प्रजननसंस्थेच्या कर्करोगात स्तनाचा, गर्भाशयमुखाचा व गर्भाशय यांचं प्रमाण जास्त दिसतं. पुरुषांमध्ये लिंग व वृषणाच्या कर्करोगाचं प्रमाण कमी दिसतं, त्याच्या तुलनेत पूरस्थ ग्रंथीच्या कर्करोगाच प्रमाण जास्त दिसतं. कर्करोगाचं जेवढ्या लवकर निदान होतं, तेवढ्या लवकर त्याच्यावर मात करायला सोपं जातं. म्हणून स्तनांचं अधूनमधून निरीक्षण करणं, पस्तिशीनंतर दर वर्षाने गर्भाशयमुखाची तपासणी करण्यावर डॉक्टर भर देतात, विशेषतः जिथे फॅमिली 'हिस्ट्री' तकर्करोग आढळून आला आहे. दर दोन आठवड्यांनी एकदा स्तनांचं निरीक्षण करून स्तनांत काही बदल झालेत का हे बघावं. आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे स्तनांवरून हात फिरवून स्तनात गाठ जाणवते का? स्तनांत काही जागी खड्डे किंवा पिचल्यासारखं झालंय का? बोंडातून पू येतोय का? हे बघावं. असं काही दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्यावं. १५४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख