पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

की जाहिरात वाचताना आपली दिशाभूल होणार नाही ना याची काळजी ज्याची त्याने घेतली पाहिजे. स्वादुपिंड स्वादुपिंड 'इन्शुलिन' संप्रेरकाची निर्मिती करतं. 'इन्शुलिन' शरीराची साखर संतुलित ठेवण्यास मदत करतं. 'इन्शुलिन' निर्मितीचं प्रमाण गरजेपेक्षा कमी झालं की रक्तातील साखर वाढते. याचा शरीरावर परिणाम व्हायला लागतो. याला मधुमेह म्हणतात (डायबेटीस). शरीराला पुरेशा इन्शुलिन' ची निर्मिती करता येत नसेल, तर गोळ्या किंवा 'इंजेक्शन' घेऊन 'इन्शुलिन' ची कमतरता पुरी करावी लागते. जर मधुमेह खूप वाढला (शरीरातील साखर नियंत्रणाबाहेर गेली) तर शरीरातील काही भागांची संवेदनशीलता कमी होते. लिंगाला ताठरपणा येण्यास अडचण होते, काहींना नंपुसकत्व येतं. 2 युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन्स काही जिवाणूंमुळे मूत्रमार्ग, मूत्राशय, पूरस्थ ग्रंथी, युरेटर्स, मूत्रपिंडाला इन्फेक्शन होऊ शकतं. लघवीला जळजळ होणं, ओटीपोटात दुखणं, जननेंद्रिय दुखणं, लघवीतून रक्त/पूजाणं, थंडी-ताप येणं, अशी लक्षणं दिसतात. स्त्रियांचा मूत्रमार्ग लांबीनं छोटा असल्यामुळे स्त्रियांना हे आजार होण्याची जास्त शक्यता असते. काही वेळा मूत्रमार्ग, मूत्राशय, पूरस्थ ग्रंथी यांचा दाह होतो. यामुळे लघवी करताना वेदना होणं, ओटीपोटात दुखणं, संभोगाच्या वेळी वेदना होणं अशी काही लक्षणं दिसतात. मूत्रमार्गाच्या दाहाला 'युरेथ्रायटीस' म्हणतात. मूत्राशयाच्या दाहाला 'सिसटायटीस' म्हणतात व पूरस्थ ग्रंथींच्या दाहाला 'प्रोस्टॅटिटिस' म्हणतात. अॅलोपॅथिक औषधांनी याच्यावर इलाज केला जातो. अल्सर अल्सरमुळे लैंगिक इच्छा किंवा लैंगिक कृतीवर फरक पडत नसला, तरी त्याच्यावर उपचारासाठी घेतलेल्या काही औषधांचा लैंगिक अनुभवावर परिणाम होऊ शकतो. अल्सर बरा व्हावा म्हणून जी औषधं घेतली जातात ती पोटातील आम्ल तयार होण्याची मात्रा कमी करणं, आम्ल तयार झालं असेल तर त्याचं दुसऱ्या रसायनात रूपांतर करणं अशा विविध मार्गांनी काम करतात. यांतील काही औषधं 'अँटी-अँड्रोजेन' म्हणून काम करतात. त्यामुळे अशा काही औषधांमुळे पुरुषाच्या लैंगिक इच्छा व उत्तेजनेत बाधा येणं, पुरुषाच्या स्तनांची वाढ होणं, असे दुष्परिणाम दिसू शकतात. १५२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख