पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेळा घ्यायची हे त्यांच्या सल्ल्यानुसारच ठरवावं. बाजारात अनेक 'शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधं, स्प्रे, तेल उपलब्ध आहेत. ही औषधं कोणालाही उपलब्ध होतात. ही औषधं घेऊन पुरुषाला मानसिकदृष्ट्या आपल्या लैंगिक सुखात वाढ होतेय असं वाटतं, पण प्रत्यक्षात या औषधांनी लैंगिक उत्तेजना किंवा संभोगाचा कालावधी वाढतो का? त्याच्याबद्दल कोणताही पुरावा माझ्यापाशी उपलब्ध नाही. या औषधांचे कोणते दुष्परिणाम होतात याच्यावर फारसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे अशा औषधांवर पैसा खर्च करायचा की नाही हे ज्याचं त्यांनं ठरवावं. 'द ड्रग्ज अंड मॅजिक रेमेडिज अॅक्ट १९५५' मध्ये लैंगिक सुख वाढवायच्या औषधांच्या जाहिरातींवर निबंध घातले आहेत. तरीही काहीजण शब्दांचा खेळ करून अशा औषधांची जाहिरात करतात. उदा. 'जोश व शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या.' जाहिरातीत ताकदवान पुरुष व मादक स्त्रीचं अर्धनग्न चित्र असतं. वाचणाऱ्याला वाटतं की ती जाहिरात लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्यांची आहे. उदा. जेव्हा '३०३ गोळ्या, जोश व शक्ती वाढवणाऱ्या, प्रौढ पुरुषांसाठी.' अशी जाहिरात आली तेव्हा जाहिरात देणाऱ्या संस्थेवर केस दाखल केली गेली. कोर्टानं निकाल देताना सांगितल, की ही जाहिरात एखादया आजारासाठी औषध पुरवत नाही. या जाहिरातीत आजाराचा उल्लेख नाही. अॅक्टमधील उल्लेख लैंगिक सुखाबद्दल आहे. या जाहिरातीत संभोग, लैंगिक सुख असे शब्द नाहीत. काहीजण या जाहिरातीचा तसा अर्थ लावू शकतील पण म्हणून ती जाहिरात लैंगिक सुखाबद्दलच आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. या कारणास्तव ही जाहिरात या अॅक्टचं उल्लंघन करते असं मानता येणार नाही. या उदाहरणावरून स्पष्ट होतं शाक्ति आणि स्पू NO SIDE EFFECTS २० फॅपसूल्स मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १५१