पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग्रंथी संप्रेरक सोडणं बंद करते. कालांतराने रक्तातील संप्रेरकाचं प्रमाण कमी झालं की परत ग्रंथी रक्तात संप्रेरक सोडते. स्नायू वाढण्यास मदत व्हावी म्हणून काही मुलं 'जिम'मध्ये जाऊन दीर्घ काळासाठी 'अॅनॅबॉलिक स्टेरॉइड्स' (अँड्रोजेन संप्रेरक) घेतात. दीर्घ काळ स्टेरॉइड्स घेतल्यामुळे बाहेरून 'अॅड्रोजेन' मिळत असल्यामुळे वृषणांमध्ये 'अॅड्रोजेन' ची निर्मिती कमी होऊ लागते. कालांतराने हे बाहेरचे संप्रेरक घेणं बंद केलं तरी या संप्रेरक निर्मितीचं काम सुरू होण्यास वेळ लागतो. पुरुषबीजनिर्मितीवर विपरीत परिणाम होतो. काहींच्या स्तनात वाढ होते. स्त्रियांमध्ये 'अँड्रोजेन' संप्रेरक जास्त प्रमाणात निर्माण झाले किंवा स्त्रियांनी काही कारणासाठी इंजेक्शनवाटे ते घेतले (उदा.काही वेटलिफ्टर्स) तर त्यांचं शरीर पुरुषी बनायला लागतं. अंगावर केस येणं, आवाज बसणं असे बदल दिसून येतात. त्यांच्या लैंगिक इच्छेतही वाढ होते. सेक्स ड्रग्ज लैंगिकतेच्या कार्यशाळेत हमखास विचारलेल्या प्रश्नांच्या यादीत -"बाजारात 'व्हायाग्रा' औषधं मिळतं ते संभोगाचा कालावधी वाढवतं का?" हा प्रश्न हमखास असतोच. व्हायाग्रा व त्याच्यासारखी औषधं संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी नाहीत, ती आहेत लिंगाला उत्तेजना आणण्यासाठी, जर लैंगिक इच्छा होत असेल पण काही कारणानी लिंगाला ताठरपणा येत नसेल किंवा पुरेसा ताठरपणा येत नसेल, तर ही औषधं लिंगाला ताठरपणा आणण्यास मदत करतात. या औषधांनी संभोगाचा कालावधी वाढत नाही. अशा औषधाची गोळी अंदाजे एक तास संभोगाच्या अगोदर घ्यावी लागते. गोळी घेतली की लिंग आपोआप उत्तेजित होत नाही. लैंगिक इच्छा नसेल तर गोळी घेऊनही काहीही फायदा होत नाही. लैंगिक इच्छा जागृत झाली तर या गोळीतील रसायनामुळे रक्तवाहिन्या रुंदावतात. याच्यामुळे लिंगात जास्त रक्तप्रवाह होतो व लिंगाला ताठरपणा येतो. (स्त्रीने अशा प्रकारचे औषध घेतलं तर तिच्या जननेंद्रियांनाही जास्त रक्तप्रवाह होतो.) अशा औषधांचे काही दुष्परिणाम आहेत. दृष्टीवर काही काळ परिणाम होणं, शरीराला कंप सुटणं, दरदरून घाम येणं, मळमळणं इत्यादी. या औषधांनी रक्तवाहिन्यांचा व्यास वाढल्यामुळे रक्तदाब कमी होतो. रक्तदाब खूप कमी झाला तर जिवाला धोका होतो. म्हणून ज्यांना हृदयविकार आहे, रक्तदाबाचा आजार आहे, या आजारांवर औषधं चालू आहेत अशांना या गोळ्यांपासून मोठा धोका आहे. म्हणून अशी औषधं आपल्या मनानं घेऊ नयेत. ही औषधं घ्यायच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. किती मात्रेची गोळी आठवड्यातून किती १५० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख