पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'अँड्रोपॉज' उतारवयात लिंग ताठ न होणं, लिंग पूर्ण ताठ न होणं असे अनुभव जास्त वेळा यायला लागतात. हे बदल एकदम होत नाहीत, जसंजसं वय वाढतं तसतसे हे बदल हळूहळू होऊ लागतात. याला अंड्रोपॉज' म्हणायचं का? हा वादाचा मुद्दा मानला जातो. स्त्रीबीजांड 'इस्ट्रोजेन' व 'प्रोजेस्टेरोन' या संप्रेरकांची निर्मिती बहुतांशी स्त्रीबीजांडात होते, व थोड्या अंशी 'अॅड्रेनल' ग्रंथींमध्ये होते. स्त्रियांचं मासिक पाळीचं चक्र या संप्रेरकांवर अवलंबून असतं. जर ठराविक वेळी हे संप्रेरक पुरेशा प्रमाणात तयार झाले नाहीत, तर पाळीच्या चक्रात बदल होतो व गर्भधारणेस अडचण येऊ शकते. स्त्रियांमध्ये अँड्रोजेन' संप्रेरक थोड्या अंशी अॅड्रेनल' ग्रंथीत तयार होतं. ४५-५० वयाच्या आसपास स्त्रियांची पाळी अनयिमित व्हायला लागते. दोन- तीन महिन्यांतून एखादयावेळी पाळी येणं, महिन्यात अधेमध्ये रक्त जाणं असं व्हायला लागतं व मग काही काळाने पाळी पूर्णपणे बंद होते. साधारणतः एक वर्ष पाळी आली नाही, तर रजोनिवृत्ती आली आहे असं मानलं जातं (सगळ्या स्त्रियांची रजोनिवृत्ती ४५-५० वर्षांच्या आसपास येईल असं नसतं. क्वचित काहींची ६० वर्ष उलटली तरी रजोनिवृत्ती येत नाही, तर क्वचित काहीजणींची रजोनिवृत्ती ३० च्या आसपासही येऊ शकते.) रजोनिवृत्ती आली, की महिन्याला स्त्रीचं बीज परिपक्व होणं बंद होतं, पाळी बंद होते. स्त्रीबीजांडात 'इस्ट्रोजेन' व 'प्रोजेस्टेरोन' या संप्रेरकांच्या निर्मितीत घट होते. ही घट झाल्यामुळे काहींना अधूनमधून चटका बसेल एवढं गरम अंग जाणवणं ('हॉट फ्लशेस'), चिडचिड होणं, दरदरून घाम येणं, खूप नैराश्य येणं हे बदल दिसू शकतात. लैंगिक इच्छा कमी होते. योनी, मोठं भगोष्ठ, छोटं भगोष्ठ व शिस्निका आकुंचन पावते. योनीच्या आतील बाजूस येणारा ओलावा कगी होतो. योनी कोरडी पडल्यामुळे लिंग-योनीमैथुनाच्या वेळी घर्षणानं योनीत दुखू शकतं. काही स्त्रियांना कमी प्रमाणात तर काही स्त्रियांना खूप जास्त प्रमाणात हे त्रास होतात. डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने 'इस्ट्रोजेन रिप्लेसमेंट थेरपी' घेता येते. त्याने हे दुष्परिणाम कमी होतात, लैंगिक इच्छेच्या निर्मितीस मदत होते. खेळांडूमधील संप्रेरकांचा वापर (स्टेरॉइड्स) अनेक संप्रेरकांचं शरीरातील प्रमाण 'फिडबॅक' यंत्रणेवर आधारित असतं. म्हणजे रक्तातील एखादया संप्रेरकाचं प्रमाण कमी झालं की तो संप्रेरक निर्माण करणारी ग्रंथी रक्तात संप्रेरक सोडते. रक्तातील संप्रेरकांच प्रमाण पुरेसं असलं, की मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १४९