पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संप्रेरक निर्माण करणाऱ्या काही ग्रंथी हायपोथैलेमस पीच्युटरी- थायरॉइड अॅड्रेनल स्वादुपिंड स्त्रीबीजांड वृषणः प्रमाणात निर्मिती झाली नाही किंवा गरजेपेक्षा जास्त झाली, तर त्याचा शरीरावर, प्रजनन कार्यावर व लैंगिक इच्छांवर परिणाम होतो. पुरुषांमध्ये अँड्रोजेन' (व त्याच्यापासून तयार होणारं 'टेस्टोस्टेरॉन') संप्रेरकाची बहुतांश निर्मिती ही वृषणात होते. पुरुषांमध्ये थोड्या अंशी 'इस्ट्रोजन' व 'प्रोजेस्टेरॉन' निर्मिती अॅड्रेनल' ग्रंथीमध्ये होते. अँड्रोजेन' मुळे पुरुषांच्या अंगावर केस येणं, आवाज बसणं, पुरुषबीज निर्मिती होणं असे बदल दिसतात. या संप्रेरकामुळे शरीराला पुरुषी ढाचा येतो. या संप्रेरकाचा लैंगिक इच्छेशी संबंध आहे. जर काही कारणानी या संप्रेरक निर्मितीत घट झाली तर त्याच्यामुळे लैंगिक इच्छा कमी होतात, अंगावरचे केस कमी होतात व स्तनांची वाढ होते. जर रक्तात याचं प्रमाण खूप कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधावाटे ते शरीराला पुरवता येतं. १४८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख