पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केली व डॉक्टरांनी माझ्यावर दया करून माझं औषध बदलून दिलं. औषधांमुळे लिंगाला ताठरपणा येत नसेल, तर अशा परिस्थितीत जोडीदाराशी लैंगिक जवळीक साधायला संकोच वाटतो. याच्यामुळे काहीजण जोडीदाराला टाळायला लागतात. यामुळे दोघांमध्ये ताण निर्माण होतो. ही औषधं थांबवली की हे दुष्परिणाम हळूहळू दिसेनासे होतात, म्हणून आवश्यक असूनसुद्धा काहीजण ही औषधं घ्यायची टाळाटाळ करतात. सगळ्यांनाच सगळ्या औषधांचे असे दुष्परिणाम जाणवतात असं नाही. काहींना ते अजिबात जाणवत नाहीत, तर काहींना सुरुवातीला जाणवतात व नंतर ते कमी होतात. अनेक वेळा हे दुष्परिणाम दिसत असतील तर ते औषधांमुळे होत असतील हा तर्क पेशंटला लावता येत नाही. तर्क लावला तरी डॉक्टरांपाशी असल्या गोष्टी कशा बोलायच्या? म्हणून हा विषय काढत नाहीत. अनेक वेळा डॉक्टरही, औषधांच्या लैंगिक दुष्परिणामांची कल्पना देत नाहीत. काही डॉक्टरांचं मत असतं, की तुमचा आजार बरा होतोय ना? लैंगिक पैलू काही महत्त्वाचा नाही. त्यात झाले थोडे दुष्परिणाम तर झाले. (जसा डॉक्टरांचा दृष्टिकोन तसाच संशोधन करणाऱ्यांचा. अनेक औषधांचा लैंगिक इच्छा व लैंगिक कार्यावरच्या परिणामांवर पुरेसा अभ्यास झालेला नाही.) डॉक्टरांनी लैंगिक परिणामांची कल्पना पेशंटला देणं गरजेचं आहे. यानं किमान पेशंटची मानसिक तयारी होते. काय दुष्परिणाम होणार, किती दिवस ते राहणार इत्यादी. औषधं एक- दोन महिन्यांसाठीच असतील व त्याचे दुष्परिणाम फार गंभीर नसतील, तर आपण ते सहन करतो. पण काही औषधं आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. महिनोन्महिने, वर्षांनुवर्षे ती घ्यावी लागतात. अशा वेळी जर एखादं औषध आपल्याला लैंगिक दुष्परिणाम दाखवत असेल तर पेशंटनी या गोष्टीबद्दल डॉक्टरांकडे मोकळेपणानं बोलायला शिकणं जरूरीचं आहे. लाजायचं अजिबात कारण नाही. त्याचबरोबर त्यांनी इंटरनेटवरूनही औषधांच्या दुष्परिणामांची माहिती मिळवावी. शारीरिक आजार ग्रंथी व संप्रेरक आपल्या शरीरात काही ग्रंथी आहेत ज्या विशिष्ट संप्रेरक निर्माण करतात. हे संप्रेरक नलिकांवाटे किंवा रक्तातून शरीरात इतर अवयवांना पोहोचवले जातात. हे नाव विविध अवयवांच्या कार्याचं नियंत्रण करतात. संप्रेरक तयार करणारे काही महत्त्वाचे अवयव आकृतीत दिले आहेत. यातील 'हायपोथैलेमस', 'पीच्युटरी', 'अॅड्रेनल' ग्रंथी, पुरुषांमध्ये वृषण व स्त्रियांमध्ये स्त्रीबीजांड यांच्यात तयार होणाऱ्या संप्रेरकांचा लैंगिक इच्छा व प्रजनन कार्याशी संबंध आहे. या संप्रेरकांची जर योग्य मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १४७