पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

न्यूरॉन अॅक्सॉन -रिसेप्टर न्यूरोट्रान्समीटर ही औषधं घेऊन हळूहळू आपल्या मेंदूच्या कार्यात संतुलन यायला लागतं. हे संतुलन मिळवायला डॉक्टरांना अंदाज करून औषधांची मात्रा कमी-जास्त करावी लागते. जर औषधांचे खूप दुष्परिणाम असतील तर डॉक्टरांना औषधं बदलून दयावी लागतात. काही औषधांमुळे लैंगिक इच्छा कमी होणं, लिंगाला उत्तेजना न येणं (किंवा अर्धवट उत्तेजना येणं), वीर्यपतन न होणं, शीघ्रपतन होणं, वीर्यपतन झालं तरी त्यातून आनंद न मिळणं, योनीला कोरडेपणा येणं, स्त्रियांना लैंगिक उत्कर्ष बिंदू अनुभवता न येणं असे विविध परिणाम दिसू शकतात. माझाच एक पूर्वीचा अनुभव. मला नैराश्य आलं होतं. काम खूप वाढलं होतं पण कामात लक्ष लागत नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टींनी खूप चिडचिड व्हायची व एकदा राग आल्यावर किरकोळ कारणावरून मी एका विक्रेत्याला मारहाण केली. संयम सुटत चाललाय, हे लक्षात आल्यावर मी एका मानसोपचारतज्ज्ञाकडे गेलो. माझी आक्रमकता व माझं नैराश्य हे दोन्ही बोथट करण्यासाठी त्यांनी मला गोळ्या दिल्या. या औषधांमुळे मला कोणत्याच भावना पूर्णपणे जाणवेनाशा झाल्या. त्यामुळे अर्थातच माझं वीर्यपतन होतानासुद्धा मला सुख मिळायचं नाही. माझं हे (सर्वांत मोठं) दुःख मी डॉक्टरांना सांगितलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले, की "कोणती विशिष्ट भावना तुला पूर्णपणे उपभोगू दयायची व कोणती नाही हे त्या औषधाला कळत नाही. ते सगळ्याच भावना बोथट करणार." माझं सगळ्यात आवडतं सुख हिरावून या गोळ्या माझं नैराश्य वाढवतील, कमी करणार नाहीत, अशी मी गयावया आपला १४६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख