पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाजली किंवा दाराची बेल वाजली की धास्ती भरते, हात कापायला लागतात, छातीत धडधडायला होतं. फोबिया फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीची कमालीची भीती वाटणं, उदा. एचआयव्हीची चाचणी करून एचआयव्हीची लागण झाली नाही असा रिपोर्ट आला तरी आपल्याला एचआयव्हीची लागण झाली आहे असं मानून परत परत एचआयव्हीची चाचणी करत राहणं (एचआयव्ही फोबिया); मोकळ्या जागेत जायची भीती वाटणं/खूप असुरक्षित वाटणं ('अॅगोराफोबिया') इत्यादी. ओ.सी.डी. (ऑबसेसिव्ह कंपलसीव्ह डिसऑर्डर) या आजारात एखादया गोष्टीचा ध्यास लागतो (ऑबसेशन) व त्या सक्तीच्या इच्छेतून मुक्तता व्हावी म्हणून काही विशिष्ट क्रिया परत परत केल्या जातात. (कंपलशन) उदा.१. स्वच्छेतचा कमालीचा ध्यास असल्यामुळे (ऑबसेशन) एखादा धुळीचा कण जरी हाताला लागला तरी परत परत साबणाने हात धुवायची इच्छा होणं (कंपलशन). उदा.२. घर चोरांपासून सुरक्षित राहण्याचं 'ऑबसेशन' असल्यामुळे कुलूप नीट लावलं आहे की नाही हे वारंवार तपासून बघणं (कंपलशन). मानसिक आजार अनेक कारणांमुळे होऊ शकतात. मेंदूमधील 'न्यूरोट्रान्समीटर्स'चं कार्य, 'रिसेप्टर्स' ची संख्या, व्यक्तिमत्त्वाची घडण, पूर्वीचे अनुभव, सामाजिक प्रभाव इत्यादी. कॉन्सेलिंग, थेरपी व औषधं घेऊन या आजारांवर नियंत्रण आणायचा प्रयत्न केला जातो. मानसिक आजारांवरची औषधं विविध इंद्रियांतून येणाऱ्या संदेशांना मेंदू अर्थ लावून प्रतिसाद म्हणून नवीन संदेश शरीराच्या विविध अवयवांना पाठवत असतो. मेंदूचे विविध भाग असंख्य विशिष्ट पेशींनी ('न्यूरॉन्स') बनलेले असतात. या पेशी एकमेकांना थेट जोडलेल्या नसतात. दोन पेशींच्यामध्ये छोटीशी 'गॅप' (मोकळी जागा) असते. या जागेतून, या पेशी रासायनिक, विदयुत माध्यमांतून संदेश पाठवतात. या संदेश पाठवणाऱ्या घटकांना 'न्यूरोट्रान्समीटर्स' म्हणतात. या संदेश पाठवायच्या यंत्रणेत गडबड झाली तर काही मानसिक आजार होतात. पुरेसे संदेश गेले नाहीत, गरजेपेक्षा जास्त संदेश पाठवले गेले, तर अशा बदलांमुळे कमालीचं नैराश्य येणं, अतिउत्साह येणं असे विविध परिणाम दिसतात. काही औषधं न्यूरॉन्स' मधील संदेश कमी/जास्त करून आजारांवर नियंत्रण आणतात. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १४५