पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही वेळा या संदेशांचा लैंगिक वर्तनावरही परिणाम दिसू शकतो. उदा. एखादा आवाज सांगत असेल की आत्ता कपडे काढून हस्तमैथुन कर, तर ती व्यक्ती आजूबाजूला कोण आहे याचा विचार न करता तसं करू शकते. मेनिया मेनिया हा मूड' चा आजार आहे. या आजारात ती व्यक्ती काही काळ अति उत्साहात असते. काहींना या स्थितीत भ्रम होतात. (उदा. मी या देशाचा राजा आहे.') काहींमध्ये आक्रमकपणा वाढतो. झोप कमी होते. काहीजण थोडा काळ मेनिया व थोडा काळ नैराश्य अशी 'बाय-पोलर' चक्रं अनुभवतात. अतिउत्साहाच्या काळात काहींच्या लैंगिक वर्तनात फरक पडतो. एकजण म्हणाले,"मी जेव्हा 'हाय'मध्ये असतो तेव्हा मला खूप सेक्स करायची इच्छा होते. कुणाबरोबर कुठेही सेक्स करावासा वाटतो. चार लोकांच्या समोर कसं गायचं नियंत्रण सुटत जातं आणि मी एखादया व्यक्तीवर तुटून पडायची वेळ येते." काही मानसिक आजारांमध्ये वास्तवाचं भान सुटत नाही पण तरीही खूप त्रास होऊ शकतो. हा उपद्रव होताना, आपल्याला जे वाटतंय ती सर्वसामान्य स्थिती नाही, याची बऱ्यापैकी जाण असते. त्या स्थितीचा त्रास जाणवतो व ती बदलायची इच्छा असते. उदा. नैराश्य, 'गझायटी', फोबिया', 'ओ.सी.डी. इत्यादी. 7 7 नैराश्य सगळ्यांनाच अधूनमधून नैराश्य येतं. पण ते तात्पुरतं असतं, परिस्थितीनुरूप ते असतं. कालांतरानं, परिस्थिती बदलली की ते कमी होतं. पण काही वेळा नैराश्य अनेक महिने राहतं. आजूबाजूची परिस्थिती बदलली तरी त्याची तीव्रता कमी होत नाही. काही करायची इच्छा होत नाही, खाण्यावर परिणाम होतो, झोपेवर परिणाम होतो, नैराश्य तीव्र असेल तर आत्महत्या करायची इच्छा होते. नैराश्याच्या काळात लैंगिक इच्छा कमी होतात, लैंगिक इच्छा झाली तरी लिंगाला ताठरपणा न येणं, लवकर वीर्यपतन होणं असे परिणाम दिसतात. जर नैराश्याची स्थिती महिना - दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहिली, नैराश्य खूप तीव्र असेल तर औषधं घ्यावी लागतात. उदा. काही स्त्रियांना बाळंतपणानंतर महिन्याभरात खूप नैराश्य येऊ शकतं (पोस्ट-पार्टम डिप्रेशन). अँग्झायटी दैनंदिन जीवनात आपल्याला कामाचं अधूनमधून दडपण येणं साहजिक आहे पण काही वेळा सर्वसामान्य गोष्टीचं इतकं सतत दडपण जाणवू लागतं, की त्याचा आपल्या दिनचर्येवर मोठा प्रभाव पडू लागतो. उदा. काहीजणांना फोनची रिंग १४४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख