पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आजार आणि औषधं - आजार मुख्यतः दोन विभागांत मोडता येतात - मानसिक व शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम झाला की त्याचा शरीरावरही परिणाम होतो. तसचं शारीरिक आजारामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यात भर पडते, या आजारांवर घेतल्या जाणाऱ्या औषधांची. या औषधांचे अनेक दुष्परिणाम असतात.एक क्लायंट म्हणाला, “ मला लैंगिक इच्छाच होत नाही आणि झाली तरी लिंग पूर्ण ताठ होत नाही. मागच्या दोन महिन्यांपासून हा प्रॉब्लेम आहे." जास्त विचारणा केल्यावर कळलं की त्याला मानसिक आजारांसाठी गोळ्या दिल्या होत्या. या गोळ्यांचे हे परिणाम होते. पण डॉक्टरांनी असे परिणाम होतील याची कल्पना दिली नव्हती. काही मानसिक व शारीरिक आजारांमुळे व काही औषधांमुळे लैंगिक अनुभवावर प्रभाव पडतो. याची थोडक्यात ओळख खाली दिली आहे. मानसिक आजार आपल्या सर्वांनाच अधूनमधून काही मानसिक आजारांची लक्षणं दिसतात. पण दरवेळी तो मानसिक आजारच असतो असं नाही. उदा. अधूनमधून नैराश्य येणं, किरकोळ गोष्टींचं खूप दडपण वाटणं, कामाच्या तणावामुळे लैंगिक इच्छा कमी होणं, संभोगाच्या वेळी लिंगाचा ताठरपणा जाणं इत्यादी. पण हे सर्व तात्पुरतं असतं. काही आठवड्यांत ही लक्षणं दिसेनाशी होतात. जर महिना - दोन महिन्यानंतर ही मानसिक आजाराची अनेक लक्षणं दिसत राहिली, त्याची तीव्रता खूप असेल, आपल्या आयुष्यावर या लक्षणांमुळे मोठा प्रभाव पडत असेल, तर तो मानसिक आजार असू शकतो. - स्किझोफ्रेनिया या आजारात व्यक्तीला काही काळ श्रवण/दृष्टी/स्पर्श/चव/वास याचे अवास्तव अनुभव येतात. उदा. एखाद्या व्यक्तीला इतरांना ऐकू न येणारं भाष्य ऐकू येतं/संवाद ऐकू येतात, तर कोणाला इतरांना न दिसणाऱ्या व्यक्ती दिसू लागतात. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १४३