पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. जसजशा स्त्रिया शिकून स्वत:च्या पायावर उभ्या राहू लागल्या आहेत तसंतसं काहींना नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस सामोरं जावं लागत आहे. याच्यावर सुप्रीम कोर्टाने काही 'गाईड लाइन्स' (विशाखा केस) दिल्या आहेत. त्यातील ठळक मुद्दे -

  • कोणत्याही कामगाराला लैंगिकदृष्ट्या स्पर्श केला जाऊ नये.
  • कामगारांना लैंगिक संबंध करण्यास मागणी करू नये.
  • लैंगिक छटा असलेले शब्द/भाषा वापरली जाऊ नये.
  • कामगारांना अश्लील चित्रं दाखवली जाऊ नयेत.

१४२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख