पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वत:च्या लैंगिकतेबद्दलचा दृष्टिकोन आणखीनं व्यापक होतोय असं वाटतंय. हे सगळं इथे मांडण्याचा खटाटोप का? स्वत:चा आवाज उठवण्यासाठी मला एखादा मंच नकोय. मला न्याय मिळावा अशी माझी भाबडी समजूत तेव्हाही नव्हती आणि आज त्याची गरजच वाटत नाही. आपल्या आयुष्यात आगंतुकासारख्या आलेल्या या घटनेला उलगडून सांगणं थोडं त्रासदायक होतं. हे वाचून कुठल्या बलात्कार करणाऱ्याची मानसिकता बदलेल असा माझा आशावादही नाही. झालंच काही तर अशी घटना ज्या व्यक्तीच्या आयुष्यात घडेल आणि त्याच्या हे वाचनात आलं तर त्याला/तिला आपण एकटेच आहोत, असं वाटू नये. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, वेदना सगळ्यांची सारखीच असते." लैंगिक अत्याचार व कायदा बलात्कार आत्ताच्या कायदयानुसार (भा.दं.सं.३७५/३७६) कोणत्याही पुरुषानं जबरदस्तीनं स्त्रीवर केलेल्या लिंग-योनीमैथुनाला बलात्कार समजला जातो. याला अपवाद नवरा-बायकोचं नातं. नवऱ्याने आपल्या बायकोबर जबरदस्तीनं केलेल्या लिंग-योनीमैथुनास बलात्कार समजला जात नाही. स्त्री किंवा पुरुषाशी जबरदस्तीनं केलेल्या गुदमैथुन किंवा मुखमैथुन बलात्कार समजला जात नाही. हे जबरदस्तीनं केलेले संभोगाचे प्रकार ३७७ कलमाखाली येतात. ३७५/३७६ कलम बदलावं व बलात्काराची व्याख्या जास्त व्यापक व्हावी (यात जबरदस्तीने केलेल्या मुखमैथुन, गुदमैथुन इत्यादी कृतींचा समावेश व्हावा) म्हणून 'साक्षी' संस्थेनं दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती पण तिला यश आलं नाही. 7 लहान मुलांचं लैंगिक शोषण लिंग-योनीमैथुना व्यतिरिक्त इतर मागांनी केलेलं लहान मुला/मुलींचं लैंगिक शोषण भा.दं.सं. ३७७ कलमाखाली मोडतं. स्त्रियांची लैंगिक छळवणूक १. कोणत्याही स्त्रीशी अश्लील वर्तन करणं, ज्या कृतीने तिचं चारित्र्यहनन होईल अशी कृती करणं भा.दं. सं. ५०९ नुसार दंडनीय आहे. २. नवऱ्याने लग्न झाल्यावर बायकोशी दीर्घकाळ संभोग न केल्यास बायकोला घटस्फोटाची मागणी करता येते. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १४१