पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'अँटी-रॅगिंग सेल्स' नाहीत. कॉलेजमधील कोणा मुला/मुलीचं रॅगिंग होत असेल किंवा झालेलं असेल, तर कोणत्या कॉन्सेलरकडे जायचं हे विदयार्थ्यांना माहीत नसतं. माहीत असलं तरी अनेकजणांचा त्या व्यक्तीवर विश्वास नसतो कारण विदयार्थ्यांबरोबर कॉन्सेलरनी कधीही 'पो' बांधण्याचा प्रयत्न केलेला नसतो. प्रत्येक कॉलेजमध्ये दरवर्षी रॅगिंग होतं हे जर आपल्याला माहीत आहे तर प्रत्येक कॉलेजमध्ये अँटी-रॅगिंग समिती का स्थापन केली जात नाही? रॅगिंग होऊ नये व झालंच तर कोणाकडे तक्रार करायची, कोणत्या समितीनं चौकशी करायची या सगळ्या प्रक्रियेत कॉलेजमधील विदयाथ्यांचा सहभाग घेऊन रॅगिंगवर नियंत्रण आणण्याची पावलं का उचलली जात नाहीत? स्त्रियांचा लैंगिक छळ मी जेव्हा 'संवाद' एचआयव्ही/एड्स हेल्पलाईनच्या कॉन्सेलर्सना प्रशिक्षण देत होतो, तेव्हा हेल्पलाईनवर काम करणाऱ्या स्त्रिया अनेक वेळा तक्रार करायच्या, की काही पुरुष कॉलर्स, पुरुष कॉन्सेलरचा आवाज ऐकला की फोन बंद करतात. पण बोलणारी जर बाई असेल तर तिला मुद्दामहून सेक्सची वर्णनं ऐकवणं, तिच्याकडून कंडोम कसा वापरायचा हे परत परत विचारून हैराण करणं असं सारखं होतं. पूर्वी हेल्पलाईनवर काम केलेल्या एकजण म्हणाल्या, “एक वेळ अशी आली, की आम्हाला विशिष्ट व्यक्तींचा आवाजही ओळखता यायला लागला. ते आपलं नाव बदलतात, गाव बदलतात कधीकधी आवाजही बदलायचा प्रयत्न करतात. पण आम्हांला ही सगळी सोंग कळायला लागली. पोलिसात कितीजणांबद्दल तक्रार करणार? आम्ही एचआयव्ही/एड्सवरची महत्त्वाची माहिती देतो, या कामात या लोकांचा हातभार तर लाभत नाहीच पण उलट यांच्यामुळे लाईन व्यस्त राहते व आमची चिडचिड होते. अक्षरश: वीट येतो. तुम्ही आम्हांला विरक्तपणे फोन घ्यायला शिकवलंय, पण शेवटी आम्हीसुद्धा आहोत. एका हद्दीपलीकडे नाही सहन करता येत." स्त्रियांना अश्लील फोन-कॉल येणं हा त्यांच्या वाट्याला येणाऱ्या अनेक लैंगिक त्रासांपैकी एक आहे. बसमध्ये गर्दीत स्त्रीच्या अंगाला मुद्दाम खेटून उभं राहणं, तिच्या अंगाला अंग घासणं, बाकड्यावर बसलं तर तिच्या अंगावर रेलणं हा जवळपास प्रत्येक स्त्रीला आलेला अनुभव. तिच्या आजूबाजूला मुद्दामहून अश्लील गाणी म्हणणं, अश्लील मायना असलेले सूचक संवाद करणं, आडून लैंगिक आरोप करणं (विशेषतः एकट्या राहणाऱ्या स्त्रीवर) हे सर्रास घडतं. एकटा पुरुष बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेतो, तर इतर वेळी नाक्यावर किंवा कट्ट्यावर मित्रमंडळी बरोबर असली (गग) की एकटा असताना बळ नसलेल्यांनाही चेव येतो. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १३५