पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींची छेडछाड करणं, ती मुलगी चिडली, की तिला अजूनच उचकवणं हे नेहमीचंच. उत्सवात, गर्दीच्या वेळी तर असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. अनेक स्त्रिया असले प्रकार चूपचाप सहन करतात. त्यानं पुरुषांना अजूनच चेव चढतो. काही पुरुष तर 'तिलाही हे आवडत असणार नाहीतर ती काहीतरी बोलली असती' असा चुकीचा (व सोईचा) अर्थ काढतात. बहुतेक बायका या त्रासाला घाबरतात. जाण्या-येण्याचा रस्ता बदलतात, तोंड लपवतात, फार थोड्या खमक्या आहेत ज्या, अरे ला कारे' करून विरोध करतात. हल्ली मोबाईलच्या व इंटरनेटच्या काळात अश्लील एसएमएस करणं, मुलींचे फोटो घेऊन त्यात बदल करून त्यांचे अश्लील फोटो बनवून इतरांना ते फोटो इंटरनेटवरून पाठवणं असे उदयोगही वाढत्या प्रमाणात होऊ लागले आहेत. काहीजण गर्लफ्रेंड्सचे नग्न फोटो काढून तिला ब्लॅकमेल करतात - 'हे फोटो इतरांना पाठवायचे नसतील तर मी सांगेन ते तू केलंच पाहिजे' असा दम भरून तो पुरुष व त्याचे मित्र तिच्यावर लहर येईल तेव्हा बलात्कार करत राहतात. घरचे व समाज काय म्हणेल या भीतीतून ती स्त्री अनेक दिवस, महिने, वर्ष हे सहन करत राहते. कालांतरानं काहीजणींना हे सर्व असह्य होतं व त्या घरच्यांना सांगतात. बलात्कार कार्यशाळेत बलात्काराबाबत विषय निघाला, की पुरुषांच्या अनेक साचेबद्ध भूमिका समोर येतात. बलात्काराच्या प्रसंगातून जाताना काय भोगावं लागतं याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते. त्यामुळे या विषयाकडे बघायची नजरही 'पुरुषी' असते, दुटप्पी असते. त्या स्त्रीनंच काहीतरी चुकीचा संदेश देऊन हा बलात्कार ओढवून आणला असणार', 'तिनं असे कपडे घातले म्हणून हे असं झालं,"इतक्या उशिरा ती घराबाहेर का पडली?', 'तिनं कशाला त्या मुलाशी मैत्री केली', 'तिनं उशिरापर्यंत कंपनीत काम करायची काही जरूर होती का?' अशा विविध कारणांचा शोध घेऊन तिलाच दोषी बनवायचा प्रयत्न होतो. कार्यशाळेत मी प्रशिक्षणार्थीना विचार करायला काही अवधी देतो, की बलात्कार झाल्यावर त्या व्यक्तीला काय वाटत असेल? तिच्या मनात काय विचार येत असतील? या प्रसंगानंतर तिचा जगाकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असेल? तिची समाजाकडून काय अपेक्षा असेल? या पैलूंवर चर्चा करताना काहीजणांची संवेदनशील उत्तरं येतात तर काहीजणांची अजिबात संवेदनशीलता दिसत नाही. काहीजण म्हणतात, “ती सुरुवातीला घाबरत असेल पण नंतर तीही उत्तेजित होऊन मजा घेत असणारच ना." पुरुषाबरोबर झालेला संभोग, मग तो संमतीनं नसला तरी 1 १३६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख