पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चोवीस तास नाही लक्ष देता येत, पण पाच मिनिटं जरी दुर्लक्ष झालं तरी आजूबाजूच्या कोणाची विपरीत नजर पडेल सांगता येत नाही. एक मतिमंद मुलगी फ्लॅटमधून खाली उतरून 'स्पेशल अॅबिलिटी' च्या शाळेत जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहायची. रिक्षा यायला अवकाश असायचा तेव्हा घरच्यांचं लक्ष नसताना त्या बिल्डिंगचा गुरखा तिच्याशी लैंगिक चाळे करायचा. ती वयात आल्यामुळे तिला तो स्पर्श आवडायचा व त्याचा तो गुरखा गैरफायदा घ्यायचा. तर दुसऱ्या एका उदाहरणात जो रिक्षावाला मतिमंद मुलीला शाळेत घेऊन जायचा तोच तिच्याशी चाळे करायचा. शाळा सुटल्यावर त्याला तिला घरी आणायला उशीर का होतो याचा शोध घेताना हे लक्षात आलं." अनघा घोष म्हणाल्या, “एकीकडे विकलांग लोकांना लैंगिक इच्छा नसतात अशी समाजाची धारणा आहे व दुसरीकडे ते सहज लैंगिक सुखासाठी उपलब्ध होतील या विचारांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणासाठी डोळा ठेवायचा अशी दुहेरी मन:स्थिती अनेक वेळा दिसते." " रॅगिंग माझ्या हेल्पलाईनवर एकदा खूप घाबऱ्या आवाजात फोन आला. एका कॉलेजमधील मुलाचा फोन होता. त्याच्यावर एक कॉलेजमधील सीनियर मुलगा रॅगिंग करत होता. हळूहळू हे रॅगिंग वाढत गेलं होतं व एक दिवस त्याच्यावर जबरदस्तीनं गुदमैथुन झाला. म्हणून हा फोन. मुलगा प्रचंड घाबरलेला होता. आज रात्री परत हाच प्रकार घडणार का याची त्याला भीती वाटत होती. त्याचा कॉलेजमधल्या शिक्षकांवर अजिबात विश्वास नव्हता. अशा वेळी त्याने कोणाची मदत मागायची? मी त्याला भेटायची तयारी दाखवली. पण तो भेटायला आला नाही. त्याच्या वाट्याला पुढे काय आलं मला माहीत नाही. अशी अनेक उदाहरणं माझ्यासमोर येतात. रॅगिंग हे सत्तेशी निगडित असल्यामुळे त्यात अपमान व अवहेलना हा महत्त्वाचा भाग असतो. म्हणून अनेक वेळा त्यात लैंगिक पैलू दिसतात. कपडे काढायला लावणं, नग्न होऊन 'कॅब्रे डान्स' करायला लावणं इत्यादी. दणकट मुलांचं रॅगिंग होणं अवघड असतं. जी मुलं/मुली सहज घाबरतात किंवा प्रतिकार करू शकत नाहीत अशी मुलं/मुली रॅगिंगला जास्त बळी पडतात. हा विषय कोणीही गांभीर्यानं घेत नाही. काही वेळा रॅगिंग इतकं टोकाचं होतं, की ती व्यक्ती आत्महत्या करते. याची उदाहरणं आपण अनेक वेळा वर्तमानपत्रात वाचतो. अशी असंख्य उदाहरणं परत परत समोर येऊनही बहुतेक कॉलेजेसमध्ये १३४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख