पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खात्रिलायक किंवा पुरावा म्हणून मानू नयेत. पण ती दिसली तर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.) शारीरिक लक्षणं जननेंद्रियांवर दिसणारे वळ, ओरखडे, जखमा, जननेंद्रियांतून रक्त येणं, वेदना होणं, रक्ताचे डाग पडलेली चड्डी, विविध वस्तू योनीत, गुदद्वारात घालायची सवय लागणं, योनी व गुदाच्या जागेवर सूज येणं, चड्डीवर, शरीरावर वीर्याचे डाग, गुप्तरोग, गर्भधारणा, स्वतःला इजा करून घेणं ('सेल्फ म्युटिलेशन'), काहीही कारण नसताना सारखं आजारी पडणं, झोपत सूसूहोऊ लागणं इत्यादी. मानसिक लक्षणं जेव्हा एखादं मूल 'माझ्या माहितीतील एका मुलाला एक व्यक्ती असं करते, तसं करते' असं सांगते, आपल्या मित्र/मैत्रिणीबरोबर किंवा खेळण्यातून लैंगिक कृतीचं अनुकरण करते, आपल्या वयापेक्षा जास्त लैंगिक संबंधांची माहिती असते, त्यांनी काढलेल्या चित्रात, सांगितलेल्या गोष्टीत लैंगिक पैलूंचा अंतर्भाव असतो, एखादया व्यक्तीची अनाठायी भीती वाटते, तिच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करते, आपली एखादी आवडती वस्तू (उदा. आइस्क्रीम) नावडायला लागते, आपली राहायची जागा सोडून दुसरीकडे जायची इच्छा धरते (घर सोडून बोर्डिंग स्कूलमध्ये जायची इच्छा धरते इत्यादी), वयापेक्षा लहान मुला/मुलींसारखे वर्तन करते, मध्येच चड्डीत लघवी किंवा संडास करते, झोप कमी होते, भीतिदायक स्वप्न पडू लागतात, भूक कमी होते, एकटं वावरायची भीती वाटू लागते, मूल एकदम खूप आज्ञाधारक बनतं, इतर मित्रांपासून, घरच्यांपासून दुरावा येतो, खेळातून/अभ्यासातून मन उडतं, मूल घरातून पळून जायचा प्रयत्न करतं तेव्हा नीट शहानिशा करावी. विकलांग व्यक्तीचं लैंगिक शोषण विविध मुलाखती घेताना 'स्पेशल अॅबिलीटी' च्या व्यक्तींच्या लैंगिक शोषणाची उदाहरणं सारखी समोर आली. एका अंध स्त्रीवर तिच्या नातेवाइकानं जबरदस्ती करायचा प्रयत्न केला होता. एका मतिमंद मुलीचं घराबाहेर पडल्यावर लैंगिक शोषण होत होतं म्हणून तिला घरात बांधून ठेवलं जात होतं. 'प्रयत्न' च्या मृदुला दास म्हणाल्या, “आम्ही घरच्यांना सारखं सांगत असतो की आपल्या मुला/मुलींकडे लक्ष दया. आईवडील लक्ष ठेवतात, पण त्यालाही मर्यादा आहेत. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १३३