पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहोत, असं वाटायला लागतं. तो लैंगिक स्पर्श जरी आवडला असला तरी त्यात स्वत:ला दोषी धरायचं काहीही कारणं नाही. लैंगिक स्पर्श आवडणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे पण त्याचा गुन्हेगाराने गैरफायदा घेणं ही चुकीची गोष्ट आहे हे लक्षात ठेवावं.

पालकांसाठी काही महत्त्वाचे मुद्दे

  • लैंगिक शोषण फक्त लहान मुलींचंच होतं असं नाही. अनेक लहान मुलांचंही

लैंगिक शोषण होतं. आपल्या लहान मुला-मुलींना ३ वर्षांचं झाल्यावर चांगल्या आणि वाईट स्पर्शातला फरक शिकवणं आवश्यक आहे. लिंगाला, वृषणाला, मायांगाला, ढुंगणाला आईवडील (व अंघोळ घालणारे, कपडे बदलणाऱ्या व्यक्ती) सोडले तर कोणालाही त्या भागांना हात लावू दयायचा नाही, ही शिकवण देणं गरजेचं आहे. जर कोणी जननेंद्रियांना हात लावला, चड्डीत हात घातला किंवा चड्डी काढायचा प्रयत्न केला, त्या भागावरून हात फिरवला तर लगेच आई-बाबांकडे येऊन मुला/मुलीनी सांगणं, ही शिकवण लहान मुला/मुलींना दिली पाहिजे.

'जर कोण्या व्यक्तीने, मुला/मुलीला त्या व्यक्तीच्या जननेंद्रियांना हात लावायला सांगितला, त्या व्यक्तीच्या चड्डीत हात घालायला सांगितला, त्या भागावरून हात फिरवायला सांगितला; किंवा त्या व्यक्तीनं मुला/मुलींसमोर आपलं मायांग/लिंग, वृषण यांचं प्रदर्शन केलं, तर लगेच आई-बाबांना येऊन सांगणं, ही शिकवण लहान मुला/मुलींना दिली पाहिजे. अशा गोष्टी जर मुला/मुलींनी आईवडिलांना सांगितल्या तर या सांगण्याकडे पालकांनी दुर्लक्ष न करता नीट शहानिशा करावी. जर शहानिशा करून हे लैंगिक शोषण आहे असं दिसून आलं तर यात मुला/मुलींची काहीही चूक नाही, फक्त ज्या व्यक्तीने हे केलं आहे त्याची चूक आहे, असं मुला/मुलींना सांगावं. लहान मुला/मुलींनी आई-बाबांना विचारल्याशिवाय कोणाकडूनही चॉकलेट, गोळ्या, खेळणं किंवा इतर गोष्टी घेऊ नयेत.

  • घरच्यांनी मुलांबरोबर जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करावा. मुलांवर लक्ष

ठेवावं, आपण घरी नसताना ते कसा वेळ काढतात, कोणाबरोबर असतात, याच्याकडे लक्ष असावं. लहान मुलांचं लैंगिक शोषण होतंय हे ओळखणं अवघड असलं तरी, काही वेळा लक्षणं दिसू शकतात. यांतील काही लक्षणं खाली दिलेली आहेत. (ही लक्षणं

१३२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख