पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" पुरुषांचा द्वेष वाटू लागणं, आपल्यावर झालेला अन्याय व्यक्त करता न आल्यामळे विध्वसंक वृत्ती होऊ लागणं, आत्महत्या करायची इच्छा होणं, नैराश्य येणं अशा अनेक प्रकारे बळी पडलेल्यांच्या मनावर परिणाम होतो. जोडीदाराशी जवळीक साधायला अडचण येऊ शकते. फार जवळीक वाटू लागली की असुरक्षित वाटू लागतं. लगेच त्याच्यापासून दूर जायची इच्छा होते. काहींना सातत्यानं नवनवीन जोडीदार मिळवायची इच्छा होते. आपल्या नात्यावर, लैंगिक आयुष्यावर व कुटुंबावर या शोषणाच्या छटा उमटतात. प्रिया म्हणाल्या, “आजही मला पुरुषांची भीती वाटते. निखळ मैत्री करणं अवघड झालंय, माझ्याशी बोलण्यामागे यांचा काय हेतू आहे? असं सारखं वाटतं. अशा सगळ्या पुरुषांची लिंग छाटून टाकावी असे विचार आजही माझ्या मनात अधूनमधून येतात. लैंगिक संबंधांवरही प्रभाव पडलाय. मला स्वत:ला स्पर्श करून सुख घेणं अस्वस्थ करतं. मला समरस होऊन लैंगिक सुख अनुभवण्यास अडचण येते. काही लैंगिक कृतींच्या बाबतीत मी 'फ्रिजीड' होते. माझ्या काही मैत्रिणींचं असंच शोषण झालं आहे. त्यांच्याशी बोलून त्यांचे अनुभव ऐकून मला मानसिक आधार मिळतो.' आपण पालक झाल्यावर आपल्या मुला/मुलींबद्दल ओव्हर प्रोटेक्टिव्ह होण्याची शक्यता वाढते. उषा म्हणाल्या, “आजही मनातल्या भावनांना पूर्णविराम मिळालेला नाही. आज मला जाणवतंय की मी माझ्या मुलीबद्दल 'ओव्हर प्रोटेक्टिव्ह' बनले आहे. मी 'ओव्हर प्रोटेक्टिव्ह' बनू नये म्हणून स्वत:ला आवर घालायचा प्रयत्न करते. पण कधीकधी अतिरेक होतो. मग माझी मुलगीच मला म्हणते. 'Its O.K. mama. सगळंच जग वाईट नाही आहे. I can take care of myself. लैंगिक शोषण झाल्यामुळे होणारा त्रास कॉन्सेलिंग, थेरपीनं कमी करता येतो. लैंगिक शोषणाचा त्रास कमी व्हावा म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टींची जाण असावी. शोषण झालेल्या व्यक्तीनं, 'यात आपला काहीही दोष नाही, आपण वाईट नाही. दोष शोषण करणाऱ्या व्यक्तीचा आहे.' हे जाणून घेतलं पाहिजे. शोषित व्यक्तीनं अपराधीपणा बाळगायचं काहीही कारण नाही. दुसरी गोष्ट, काही मुलां/मुलींचं लैंगिक शोषण होताना तो स्पर्श त्यांना आवडलेला असतो. त्यातून मिळणारं सुख हवंहवंसं वाटतं. काहींच्या बाबतीत लैंगिक शोषण झालं, की आपणहून तो अनुभव परत घेण्यासाठी पुढाकार घेतला जातो. (काहीजण तेच प्रसंग परत परत मनात आणून हस्तमैथुन करतात किंवा स्वप्नरंजन करतात.) या सगळ्या गोष्टींचा नंतर कमालीचा अपराधीपणा वाटतो. आपल्याला तो स्पर्श कसा आवडला? तो स्पर्श आवडला म्हणजे आपण वाईट मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १३१