पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, " ? माझा याला विरोध होता. एकदा एका नातेवाइकाकडे आम्ही जमलो होतो. आमची मुलं अंगणात खेळत होती. मी झोपाळ्यावर बसले होते तेव्हा मामा समोर आला व म्हणाला, कशी आहेस.' मी वस्दिशी त्याच्यावर ओरडले, 'तू एक शब्दही माझ्याशी बोलू नकोस आणि या पोरांच्या अंगाला हात जरी लावलास ना तर बघ. तो थंड पडला. त्याला माझा राग पूर्णपणे अनपेक्षित होता. मला त्याच्यावर वस्दिशी ओरडून बरं वाटलं." राजेश म्हणाले, “घरच्यांना सांगितल्यावर आम्ही 'मुस्कान' संस्थेची मदत घेतली. 'मुस्कान' च्या मदतीनं आम्ही महिला व मुलांच्या स्पेशल सेलकडे गेलो. तोवर माझ्या कानावर आलं होतं, की तो शिक्षक दुसऱ्या मुलाबरोबर हेच करतोय. त्या शिक्षकाला पोलिसांनी हेडक्वॉर्टर्सवर बोलावून घेतलं." खेदाची गोष्ट अशी, की रितसर तक्रार नोंदवून पुढे केस कोर्टात गेली तरी गुन्हेगाराला शिक्षा होणं खूप अवघड असतं. कोर्टात केस अनेक वर्ष चालते. झालेला प्रकार परत परत उगाळला जातो, चघळला जातो. या सगळ्यांत शोषण झालेली व्यक्ती व तिला आधार देणारे सर्वच भरडले जातात आणि शेवटी, जाऊ दे, जे झालं ते झालं. आपलं नशीब दुसरं काय', असं म्हणून बळी पडलेली व्यक्तीच हात टेकते. अपराधी बेफिकीरपणे समाजात वावरत असतो. (गुन्हेगाराचं लग्न झालं नसेल तर त्याच्या घरच्यांचा सूर असा असतो, की त्याचं आता आम्ही लग्न लावून देऊ, म्हणजे सर्व ठीक होईल,' आपल्या संस्कृतीत लग्न हे सर्व प्रश्नाचं उत्तर आहे.) वस्तुस्थिती ही आहे की अनेक गुन्हेगारांना आपलं काही चुकलंय असं वाटतच नाही. किंबहुना आपल्या अपराधाला शिक्षा होत नाही हे जाणवलं, की ती व्यक्ती तोच अपराध परत परत करण्याची शक्यता असते. आपल्या त्रासाला कारणीभूत असलेल्या व्यक्तीला काहीच वाटत नाही हे बघून बळी पडलेल्यालाच अजून जास्त > त्रास होतो. लैंगिक परिणाम काहीजण जे झालं ते विसरायचा प्रयत्न करतात. काहीजण झालेला प्रसंग दाबून टाकतात, काहीजण कामात गुंतवून घेतात. काहीजण मानसोचारतज्ज्ञाकडे जाऊन या प्रसंगातून सावरायचा प्रयत्न करतात. अनेक वेळा असं दिसतं की पुढे कधीतरी दुसऱ्याच एखादया प्रसंगाच्या आनुषंगाने मानसोपचारतज्ज्ञाकडे गेलं की आताच्या प्रश्नाचं मूळ, पूर्वीच्या लैंगिक शोषणाशी निगडित आहे याची जाण होते. लैंगिक शोषणाचे अनेक परिणाम होतात. या प्रसंगातून झालेल्या मनस्तापाला पूर्णविराम देणं अवघड असतं. आत्मविश्वास कमी होणं, लैंगिक अनुभव घ्यायची भीती वाटणं, १३० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख