पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मामाच्या आईला सांगितलं तेव्ही ती म्हणाली, 'तूच तसली आहेस.' या आरोपांनी मीच दोषी बनले. आपणच हे सगळं ओढवून आणलं का? आपणच वाईट आहोत का? असं वाटू लागलं. या प्रसंगामुळे लहान असताना मला चार लोकांत वावरायची भीती वाटू लागली. बाहेर खेळ खेळायलाही भीती वाटू लागली. मी एकलकोंडी बनले. अभ्यासावरही विपरीत परिणाम झाला. माझ्या तारुण्याचे दिवस नासले. ते कोण भरून देणार?" सविता म्हणाल्या, “मी एकलकोंडी बनू लागले. घरच्यांपासून अंतर ठेवू लागले. हे माझे पालकच नाहीत असं मला वाटू लागलं. माझ्या दडपणामुळे माझी पाळी अनियमित झाली. माझं खाणं वाढलं. इतकं की दोन-अडीच वर्षांत माझं वजन १० किलोंनी वाढलं. माझ्या जाडीमुळे मला चिड येऊ लागली. मी मुलांसारखे कपडे करू लागले. मुलांच्या कपड्यात माझा आत्मविश्वास वाढायचा. मुलींचे कपडे घातले, की आजही मला असुरक्षित वाटतं, वयस्कर इसम जवळपास असणंसुद्धा नकोसं वाटतं." " कन्फ्रंटेशन गुन्हेगाराला 'कन्फ्रंट' करणं हे शोषित व्यक्तीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. आपल्यावर अन्याय झाला आहे त्याच्यासाठी हा न्याय मिळवण्याचा मार्ग असतो. न्याय मिळाला नाही तर मन सदैव धुमसत राहतं. सविता म्हणाल्या, "वडिलांना सांगितल्यावर त्या दिवशी ते खूप अस्वस्थ होते, पण हे घडून खूप दिवस झालेत' असं म्हणून त्यांनी काहीच केलं नाही. मला खूप वाटतं की माझ्या पालकांनी त्या इसमाला कन्फ्रंट' करायला पाहिजे होतं. त्यानं माझ्या मनाला थोडी शांती मिळाली असती. आजही अशी एखादी गोष्ट/बातमी टीव्हीवर आली तरी मला घाबरायला होतं. माझ्या बॉयफ्रेंडला हे सर्व माहीत आहे. तो समजूतदार आहे, माझ्या भावना व 'मूड्स' समजून घेतो." बळी पडलेली व्यक्ती 'कन्फ्रंट' करायला घाबरते. म्हणून काही वेळा पालक 'कन्फ्रंट' करतात किंवा पोलिसांची लहान मुलांच्या शोषणास आळा घालण्यासाठी 'स्पेशल सेल' आहे तिचा आधार घेतात. काही पालक गुन्हेगाराला मारहाण करतात, घरची व्यक्ती असेल तर त्याला घरातून हाकलून देतात. उषा म्हणाल्या, “घरच्यांना कळल्यावर आईने भावाशी नातं तोडून टाकलं. पण सगळ्यात मोठा आधार वडिलांचा मिळाला. त्यांना कळल्यावर मोठमोठ्यांने मामाला काय शिक्षा करायची, हे बोलू लागले. बाबा माझे हिरो बनले. या प्रसंगानंतर अनेक वर्ष मामाशी काहीच संबंध आला नाही. खूप वर्षांनतर हळूहळू परत येणं-जाणं होऊ लागलं. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १२९