पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करायच्या. पुढे हे शोषण टाळण्यासाठी मी क्लासला जाणं टाळू लागलो व शेवटी क्लास बदलला. " घरच्यांना सांगणं मुलं/मुली आपल्या स्वभावानुसार व घरच्या वातावरणानुसार, घरच्यांना जे घडलंय ते सांगायचं की नाही ठरवतात. काहीजण सांगत नाहीत. सांगितलंच नाही तर घरच्यांना आपल्या मुला/मुलीवर कोणता प्रसंग ओढवतोय हे कळायला मार्ग नसतो. काहीजण घरच्यांना सांगायचा प्रयत्न करतात पण घरच्यांना कळत नाही. प्रिया (नाव बदललंय) म्हणाल्या, “मी लहान होते. सहा-एक वर्षांची असेन. मला शाळेतील काही मोठी मुलं त्यांच्यावर मुखमैथुन करायला लावायची. मी मैत्रिणींना सांगितलं, की 'मुलं मला त्रास देतात', तर त्या म्हणाल्या, की ‘सगळ्यांनाच बुलिंग'ला तोंड दयावं लागतं.' वडिलांना सांगितलं, की 'माझं बुलिंग' होतं तर त्यांनी मला कराटेचा क्लास लावायला सांगितला.' माझ्याबरोबर काय होतंय हे मला सांगताच येत नव्हतं. त्या वयात वडिलांना काय वर्णन करून सांगणार?" म्हणून लहान मुला/मुलींना 'चांगला स्पर्श' व 'वाईट स्पर्श' याच्याबद्दल पालकांनी व शिक्षकांनी माहिती देणं महत्त्वाचं आहे. घरच्यांना सांगूनही काहींच्या घरच्यांचा विश्वास बसत नाही. आपल्याबरोबर काय झालं आहे हे सविताने जेव्हा आपल्या आईला सांगितलं तेव्हा आईची प्रतिक्रिया होती, "असं कसं करतील ते. तुझ्यावर मुलीसारखं प्रेम करतात." हे सांगून पटत नाही म्हणून पुढे सविताने सांगितलं, की “त्यांनी मला छडीने मारलं. तर आईनं उत्तर दिलं, “तुला कोणीतरी शिस्त शिकवणारं हवंच." हे ऐकून ती समजून चुकली, की याच्यापुढे आईशी बोलण्यात काही अर्थ नाही. सुरुवातीला, अनेक पालकांना मुलानी/मुलीनी काहीतरी गैरसमज करून घेतला असं वाटतं. घरच्यांची सत्याला सामोरं जायची तयारी नसते. पण एकदा सत्य दिसलं, की घरच्यांना घाबरायला होतं. आता काय करायचं? हे कसं हाताळायचं? बाहेर बोभाटा होईल याची जबरदस्त भीती असते. काही वेळा त्या मुलांच्या/मुलीच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. घरच्यांना कळूनही जर घरच्यांनी काहीच केलं नाही, तर बळी पडलेल्या मुला/मुलीला आपला विश्वासघात झाल्याची भावना उत्पन्न होते. आपल्या जवळचेच जर आपला आधार बनू शकत नाहीत तर मग कोणाचा आधार घ्यायचा? आपला वाली कोण? असं वाटू लागतं व मुलं पूर्णपणे नाऊमेद होतात व शोषणाचा प्रतिकार करणं बंद करतात. काही वेळा तर या सगळ्याला त्या मुला/मुलीलाच जबाबदार धरलं जातं. उषा (नाव बदललंय) म्हणाल्या, “मामांनी मला हात लावायचा प्रयत्न केला, हे जेव्हा मी '

१२८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख