पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लैंगिक शोषणाची सुरुवात लैंगिक शोषण करणारे, मुला/मुलींशी गोड बोलतात, त्यांना अमिष दाखवतात. कोणाला सांगू नकोस अशी धमकी देतात, कधीकधी अत्यंत सरळ-सालसपणाचा आव आणून, शेळीचं कातडं पांघरून हे कोल्हे आपलं सावज पटकवतात. यातल्या अनेकजणांना एकदा सवय लागली की एका मागोमाग एक अशा अनेक मुला/मुलींचं लैंगिक शोषण करतात. लहान मुलांना लैंगिक कृतीचा अर्थ कळत नाही तर वयात येणारी मुलं/मुली भावनिकदृष्ट्या हळवी असतात, अशा वेळी त्यांचा फायदा सहज घेता येतो. सहसा शोषणकर्ते- घरचे, शेजारचे, नातेवाईक, शिक्षक, शाळा/क्लास/क्रीडांगण/बागेत जाता-येता नेहमी भेटणाऱ्या व्यक्ती असतात. शोषणकर्ता परिचयाचा असेल, आपल्या विश्वासातील असेल व आवडता असेल, तर त्याचा प्रतिकार करणं अवघड जातं. सविता (नाव बदललंय) म्हणाल्या, “मी सहावीत असताना पहिल्यांदा हे घडलं. मी घरी किल्ल्या विसरल्यामुळे शाळेतून घरी आल्यावर शेजारच्या काकाकडे थांबले. थोड्या वेळानं तो काका माझ्यापाशी आला व त्यानी माझ्या मांडीला हात लावला. मी त्याचा हात बाजूला झटकला व सांगितलं, की मला स्पर्श केलेला आवडत नाही.' पण त्याने मला धमकी दिली, की मी जर त्याला पाहिजे ते केलं नाही तर तो माझ्या मोठ्या बहिणीबरोबर तेच करेल. मी घाबरले, थरथर कापू लागले, माझा विरोध संपला, हीच माझी सर्वांत मोठी चूक होती. मग अभ्यास घेण्याचं ढोंग करून माझं गणित चुकलं, की मला छडीनं मारू लागला. माझ्या योनीत पेन घालणं, जळती सिगरेट योनीत घालणं असे प्रकार केले. मला खूप वेदना झाल्या. माझ्याबरोबर संभोग करायचाही त्यानं प्रयत्न केला पण त्याचा एक मोठा कुत्रा आहे तो त्याच्या अंगावर धावून आला म्हणून संभोग झाला नाही. या प्रसंगानंतर मला कुत्र्यांबद्दल खूप जिव्हाळा वाढला. लैंगिक शोषण फक्त मुलींचं होतं असा गैरसमज बाळगू नये. लहान व वयात येणाऱ्या मुलांचंही खूप प्रमाणात लैंगिक शोषण होतं. राजेश (नाव बदललंय) म्हणाला, “हे शोषण सुरू होईपर्यंत ट्यूशन टीचरचा मला खूप आधार होता. मी 'टिपिकल अॅडोलेसन्ट' असल्यामुळे शाळेत सिगारेट ओढायचो, घरी आईवडिलांशी भांडायचो. पण हे शिक्षक माझ्या मित्रासारखे होते. माझ्यावर विश्वास ठेवायचे. मला ती व्यक्ती चांगली आहे असं वाटायचं. मग मी ८वीत असताना माझे ट्यूशन टीचर माझ्याबरोबर लैंगिक चाळे करू लागले. क्लासच्या मागच्या खोलीत चुंबन घ्यायचे. माझ्या मांड्यांमध्ये त्यांचं लिंग घालायचे व मुखमैथुन करायचे. मला या सगळ्या गोष्टी विचित्र वाटायच्या. अस्वस्थ " मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १२७