पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आता आपण काय करायचं? हा प्रश्न समोर येतो. हे प्रकरण बाहेर आलं तर आपली अब्रू जाईल ही भीती असते. म्हणून अशा गोष्टी जरी कानावर आल्या, बघण्यात आल्या तरी बहुतेकजण कानाडोळा करतात. लहान मुलांचं लैंगिक शोषण करणारे दोन प्रकारचे असतात- १. संधी साधून शोषणं करणारे - बहुतांशजण संधिसाधू असतात. जे लहान मुला/मुलींचा उपयोग एक उपभोग्य वस्तू (सेक्स ऑब्जेक्ट) म्हणून करतात. २. 'पेडोफाइल्स'-- काही व्यक्तींना लहान मुलं/मुली लैंगिकदृष्ट्या आवडतात. यांना 'पेडोफाइल्स' म्हणतात. बहुतांश वेळा लहान मुला/मुलीचं लैंगिक शोषण पुरुष करतात पण स्त्रियांनी लहान मुलांचं शोषण केल्याचीही उदाहरणं समोर येतात. लैंगिक शोषणाचं चक्र शोषणाचा प्रयत्न En Swasted आमिष धमकी RECEN Maharashtrian पालकांना न सांगणं पालकांना सांगणं पालकांनी दुर्लक्ष करणं तक्रार गांभीर्यानं देणं शहानिशा 9-0-0 'कंफ्रंटेशन पूर्णविराम १२६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख